भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून तंदुरी रोटी करतांना त्यावर थुंकल्याचे प्रकार पुढे आले होते ! धर्मांधांची ही विकृत मनोवृत्ती लक्षात घेऊन त्याचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे प्रसिद्ध केशरचनाकार (हेअर स्टायलिस्ट) जावेद हबीब यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते एका महिलेच्या डोक्यावर थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. ३ जानेवारीला झालेल्या घटनेचा व्हिडिओ आता सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. याविषयी हबीब यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
Javed Habeeb Viral Video: जावेद हबीब द्वारा थूककर बाल बनाने का वीडियो वायरल, सीएम योगी तक पहुंची बात’#JavedHabib #Habib #InKhabar https://t.co/KmzCKudC5o
— InKhabar (@Inkhabar) January 6, 2022
१. ‘केस कसे नीट करायचे’ याचे प्रात्यक्षिक करतांना हबीब यांनी बागपत येथील बडौत येथे रहाणार्या एका महिलेचे डोके पकडले आणि जोराने हलवले नंतर तिच्या डोक्यावर थुंकून तिचे केस कापले. या घटनेने दुखावलेल्या या महिलेने सांगितले, ‘माझे नाव पूजा गुप्ता आहे आणि माझे ‘वंशिका ब्युटी पार्लर’ आहे. मी जावेद हबीब यांच्या कार्यशाळेत गेले होते. त्यांनी मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. त्यांनी माझ्याशी इतके वाईट वर्तन केले की, मी अतिशय दुखावले. ‘जर कुणाकडे पाणी नसेल, तर तुम्ही स्वतःच्या थुंकीने केस कापू शकता’, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या वर्तनामुळे मी ठरवले आहे की, मी रस्त्याच्या बाजूला असलेल्या केशकर्तनकाराकडून केस कापून घेईन; पण जावेद हबीब यांच्याकडून केस कापून घेणार नाही.’
२. जावेद हबीब यांनी महिलेच्या केसांवर थुंकताना ‘इस थूक में दम है ।’ असे म्हटले. हबीबने सांगितले, ‘हिचे केस खराब आहेत; कारण तिने शॅम्पू लावलेला नाही. केसांमध्ये पाण्याची कमतरता असल्यास, थुंकीने काम करा.’