Menu Close

हिंदूंची भूमी बळकावू पहाणार्‍या समाजवादी पक्षाचे माजी खासदार अदीब याच्यावर गुन्हा नोंद !

गुरुग्राममधील हिंदु व्यक्तीच्या समाधीची भूमी कब्रस्तान दाखवून मशीद बांधण्याचा होता डाव !

  • धर्मांध राजकारण्यांचा ‘भूमी जिहाद’ जाणा ! अशा धर्मांध नेत्याला तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
  • धर्मांध कितीही मोठे झाले, तरी ते गुन्हेगारी कृत्यच करतात आणि स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतात, हे यातून लक्षात येते !

गुरुग्राम (हरियाणा) – येथील हिंदूंची मालकी असलेले समाधी स्थळ कब्रस्तान असल्याचे सांगून तेथे मशीद बांधण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार महंमद अदीब यांच्यासह अब्दुल हसीब कासमी आणि मुफ्ती महंमद सलीम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘याद्वारे धार्मिक तणाव निर्माण करण्याचे षड्यंत्र होते’, असे पोलिसांनी म्हटले आहे.

येथील झाडसा गावातील एका हिंदु परिवाराची ही भूमी आहे आणि त्यांनी त्यांच्या एका मृत वृद्ध व्यक्तीची समाधी बनवली होती. येथे अनेक काळ कुणीच येत नसल्याचे पाहून महंमद आदीब यांनी याला कब्रस्तान दाखवून मशीद बनवण्याचा प्रयत्न चालू केला होता. पोलिसांकडून आता त्यांच्याकडे कागदपत्रे मागण्यात आली आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *