नवी देहली – प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांनी एका कार्यशाळेमध्ये महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साथीच्या कायद्याशी संबंधित कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला असून त्यांनी उत्तरप्रदेश पोलिसांना त्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले आहे. या घटनेविषयी जावेद हबीब यांनी एका व्हिडिओ प्रसारित करून क्षमा मागितली आहे. (गुन्हा नोंदवला नसता, तर हबीब यांनी क्षमा मागितली असती का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
जावेद हबीब को महिला के बालों में थूकना पड़ा महंगा, केस दर्ज, मांगी माफी https://t.co/pB5MVvrOZ9 #JavedHabib
— NBT Hindi News (@NavbharatTimes) January 6, 2022
ते म्हणाले की, माझ्या कार्यशाळेमधील काही शब्दांमुळे काही लोक दुखावले गेले आहेत. (हबीब यांच्या शब्दांमुळे नव्हे, तर त्यांनी जी विकृत कृती केली, त्यामुळे लोक दुखावले गेले आहेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) आमची कार्यशाळा व्यावसायिक आहे. अशा कार्यशाळा पुष्कळ वेळ चालतात. मी केवळ एकच सांगतो की, कुणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व. क्षमा करा, मनापासून क्षमा मागतो.