Menu Close

तमिळनाडूमधील ख्रिस्ती शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनींना अश्‍लील संदेश पाठवून मानसिक छळ !

  • चर्च किंवा ख्रिस्ती संस्था यांच्याकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्येही अनाचार चालतो, हे जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • विद्यार्थिनींना अश्‍लील संदेश पाठवणारे वासनांध मुख्याध्यापक मुलांना दिशादर्शन काय करणार ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
सामारिया योवान उच्च माध्यमिक ख्रिस्ती शाळेचे मुख्याध्यापक ख्रिस्तोफर जेबाकुमार (उजवीकडे)

तिरुनेलवेली (तमिळनाडू) – येथील शासकीय अनुदानीत आणि ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या सामारिया योवान उच्च माध्यमिक ख्रिस्ती शाळेचे मुख्याध्यापक ख्रिस्तोफर जेबाकुमार हे बारावीतील विद्यार्थिनींना भ्रमणभाषवरून अश्‍लील संदेश पाठवत होते. संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर जेबाकुमार पसार झाले आहेत.

जेबाकुमार हे ‘ऑनलाईन’ वर्गांच्या निमित्ताने विद्यार्थिनींचे भ्रमणभाष क्रमांक मिळवून त्यांना अश्‍लील पोस्ट आणि संदेश पाठवत असत. एका विद्यार्थिनीने हा धक्कादायक प्रकार मैत्रिणीकडे बोलून दाखवला असता अनेक विद्यार्थिनींना संबंधित मुख्याध्यापक अश्‍लील पोस्ट आणि संदेश पाठवत असल्याचे उघड झाले. विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसात ‘पॉक्सो’ (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्याच्या अंतर्गत तक्रार नोंदवली असता अटक होण्याच्या भीतीने मुख्याध्यापक पसार झाले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *