Menu Close

(म्हणे) ‘मुसलमानांनी कायदा हातात घेतला, तर हिंदूंना पळण्यासाठीही जागा मिळणार नही !’ – मौलाना तौकीर रझा यांची गरळओक

  • हिंदूंच्या धर्मसंसदेत कथित चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे सांगत पंतप्रधानांना पत्र लिहिणारे माजी सैन्याधिकारी आणि माजी प्रशासकीय अधिकारी आता झोपले आहेत का ? धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात सातत्याने गरळओक करून त्यांच्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक दशके चालू आहे. भारतात शांती नांदायची असेल, तर प्रथम अशांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारचे विधान मौलानाकडून होत आहे, हे पहाता ‘त्यांना कायद्याचा धाक नाही’, हेच लक्षात येते. अशांवर भाजप सरकारने तातडीने कारवाई करून कारागृहात डांबले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(मौलाना म्हणजे इस्लामी विद्वान)

मौलाना तौकीर रझा

बरेली (उत्तरप्रदेश) – मी माझ्या हिंदु बांधवांना विशेष करून सांगू इच्छितो की, ज्या दिवशी आमचे तरुण कायदा हातात घेतील, तेव्हा तुम्हाला पळण्यासाठीही जागा मिळणार नाही, अशी धमकी ‘इत्तेहाद ए मिल्लत कौन्सिल’ या संघटनेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी दिली आहे. येथील इस्लामिया मैदानात आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी धार्मिक सभेत ते बोलत होते. या वेळी २० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते. या वेळी कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले.

 

तौकीर रझा यांनी हिंदूंना आव्हान देतांना म्हटले की, तुम्हाला लढण्याची पुष्कळ आवड आहे. तुम्ही लढण्याची भाषा करता; पण लडू शकत नाही. लढणे तर आमच्या रक्तामध्येच आहे. आम्ही जन्मतः लढाऊ आहोत. आम्ही तुमच्याशी लढू इच्छित नाही; कारण तुम्ही आमचे हिंदुस्थानी भाऊ आहोत. जर लढायचेच असेल, तर चीनच्या सीमेवर जाऊया. या सभेत २० सहस्र तरुण उपस्थित आहेत. ते बलीदानासाठी सिद्ध आहेत. या तरुणांना थोडेसे प्रशिक्षण आणि शस्त्र दिल्यास ते कैलास मानसरोवर (मानससरोवर) चीनकडून घेतील आणि पाकिस्तानलाही भारताशी जोडतील. (या तरुणांच्या हातात शस्त्रे दिली, तर भारतात अराजक माजेल, हे निश्‍चित ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

सनातन धर्मियांचे रक्त म्हणजे पाणी नाही ! – जितेंद्र त्यागी यांचे रझा यांना आव्हान

२० कोटी मुसलमान एकत्र आले, तरीही ते गृहयुद्ध करू शकत नाहीत !

जितेंद्र त्यागी

मौलाना तौकीर रझा यांच्या धमकीला प्रत्युत्तर देतांना जितेंद्र नारायणसिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यागी यांनी म्हटले आहे, ‘तौकीर रझा, असदुद्दीन ओवैसी, नसीरुद्दीन शाह आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे धर्मांध यांनी २० कोटी मुसलमानांना एकत्र केले, तरी ते गृहयुद्ध करू शकत नाहीत. तुम्ही हिंदूंना घाबरवण्यासाठी धार्मिक सभांचे आयोजन करत आहात. पाकच्या इशार्‍यावर गृहयुद्धासारखे वातावरण निर्माण करत आहात. सनातन धर्मियांचे रक्त पाणी नाही जे तुम्ही सहजरित्या वाहू शकता. देशात औरंगजेब आणि बाबर यांचे शासन नाही. त्यामुळे तुम्ही शिरच्छेद करत सुटाल, अशी येथे परिस्थिती नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *