उज्जैन : हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य या प्रदर्शनातून होत आहे. मागील ६७ वर्षापासून हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याची चूक सुधारण्याचे कार्य होत आहे. या प्रदर्शनातून जनजागृती व्हावी, चुकीची प्रथांविषयी लोक जागृत व्हावे आणि धर्मशिक्षा घ्यावी अशी प्रार्थना. या प्रदर्शनाची शंकरायाचार्यनी ही भेट घ्यावी यासाठी मी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन इंदूर येथील हिंदु धर्मगुरु दशनाम गोस्वामी अखाडाचे राष्ट्रीय संरक्षक श्री महंत स्वामी मनोहरपुरीजी महाराज यांनी केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामानाने उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री लावण्यात आलेले प्रदर्शनाला भेट देण्याचा प्रसंगी ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.