Menu Close

हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून सर्वत्र होणारा विरोध आणि समाजातील मुसलमान प्रतिष्ठितांचा हिंदु मुलींशी निकाह मात्र बिनविरोध !

नाशिक येथील एक श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक असिफ याच्याशी झाला. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही’, हे कालांतराने कळेल; तरीही या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चेत आला. ‘लव्ह जिहाद’ या विषयाची व्याप्ती आणि विविध पैलू लक्षात आणून देणारी ही लेखमालिका ‘असे विवाह म्हणजे एक प्रकारे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न कसा आहे ?’, हे लक्षात आणून देईल !

श्री. शंकर गो. पांडे

लेखक – शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ


मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा यांचे प्रेम दाखवलेल्या चित्रपटाला धर्मांधांकडून विरोध !

हिंदी चित्रपट ‘बॉम्बे’

मुसलमानांमध्ये धार्मिक कट्टरता एवढी ठासून भरली आहे आणि भरवली जाते की, प्रत्यक्षात तर जाऊ द्या; पण चित्रपटातसुद्धा हिंदु नायक आणि मुसलमान नायिका यांच्यातील प्रेमसंबंधाचे काल्पनिक चित्रणसुद्धा सहन करण्याची त्यांची मानसिकता नसते. ११ मार्च १९९५ या दिवशी मणिरत्नम् दिग्दर्शित ‘बॉम्बे’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट हिंदु तरुण शेखर (अभिनेते अरविंद स्वामी) आणि मुसलमान तरुणी शैलाबानू (अभिनेत्री मनीषा कोईराला) यांच्या प्रेमकथेवर आधारित होता. या चित्रपटाला मुसलमान समाजाकडून प्रचंड विरोध झाला. अनेक गावांत चित्रपटगृहांवर आक्रमणे झाली. काही धर्मांधांनी मणिरत्नम् यांच्या घरावर बाँब टाकला. त्यात ते घायाळ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशांत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

चित्रपटातही हिंदु मुलगा आणि मुसलमान तरुणी हा विवाह मान्य नसल्याने धर्मांधांनी ठिकठिकाणी आंदोलने करून चित्रपटबंदीची मागणी करणे

हिंदी चित्रपट ‘गदर-एक प्रेमकथा’

जून २००१ मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर-एक प्रेमकथा’ या नावाचा भिन्न पंथियांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथानकाला भारत-पाकिस्तान यांच्या विभाजनाची पार्श्वभूमी होती. विभाजनाच्या कालावधीत  चित्रपटात शीख तरुण तारासिंह (सनी देओल) हा सकीना (अमिषा पटेल) नावाच्या मुसलमान तरुणीशी विवाह करून दोघे सुखाने रहात असल्याचे दाखवले होते; पण सकीनाच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. विभाजनानंतर ते सकीनाला तारासिंहसमवेत  भारतात जाऊ न देता पाकिस्तानातच रहाण्यास बाध्य करतात. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ठिकठिकाणच्या चित्रपटागृहांसमोर मुसलमान जमावाने आंदोलन करून या चित्रपटावर बंदीची मागणी केली होती.

देवानंद यांना मुसलमान असलेल्या सुरैय्याशी विवाहासाठी धर्मपरिवर्तनाची अट ठेवल्याने त्यांचा विवाह न होणे

देवानंद हा प्रसिद्ध अभिनेता तो त्या वेळची मुसलमान गायिका आणि नटी असलेल्या सुरैय्याशी विवाह करू इच्छित होता; पण यासाठी त्याच्यासमोर मुसलमान पंथाचा  स्वीकार करण्याची अट ठेवण्यात आली होती. ती त्याने नाकारल्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. तरीही हिंदूंनांच ‘धार्मिक कट्टरतावादी’ म्हटले जाते !

मुसलमान नट, खेळाडू आणि राजकारणी यांनी हिंदु मुलींशी निकाह करण्याची अनेक उदाहरणे !

अमीर खान आणि किरण राव 

याउलट हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि क्रिकेट जगतातील खान आडनावांच्या सर्व नटांच्या आणि क्रिकेटपटूंच्या बायका हिंदु आहेत. यातील काही विवाह हे एक लव्ह जिहादचाच भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा नसले तरी लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळण्यासाठीही ते केलेले असू शकतात किंवा त्यामुळे प्रोत्साहन मिळू शकते. समाजात नट, खेळाडू किंवा राजकारणी आदर्श मानले गेल्याने यांचे अनुकरण समाजाकडून सहज होऊ शकते. खानांच्या हिंदु बायकांची नावे पाहिली, म्हणजे वरील विधानाची निश्चिती होईल. चित्रपट लेखक सलीम खानची पत्नी सुशीला चरक (सलमा खान), सलीम खानच्या ३ मुलांपैकी सलमान अद्याप अविवाहित आहे, दुसरा मुलगा अरबाज खान-मलायका अरोरा यांनी नुकताच घटस्फोट घेतला. तिसरा मुलगा सोहेल खान-सीमा सचदेव, मलायका अरोराची बहीण आहे. शाहरूख खान-गौरी छिब्बर, अमीर खान-पहिली पत्नी रिना दत्त हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर दुसरी पत्नी किरण राव हिच्याशीही नुकताच घटस्फोट घेतला, अमीर खानचा पुतण्या इमरान खान-अवंतिका मलिक, संजय खानचा (मूळ नाव शहाअब्बास खान) मुलगा झायद खान-मलायका पारेख, फिरोज खानचा मुलगा फरदिन खान-नताशा माधवानी, इरफान खान-सुतापा सिकदर, नसरुद्दीन शहा-रत्ना पाठक, कबीर खान-मिनी माथूर, फारूक शेख-रूपा जैन. चित्रपटसृष्टीतील हिंदु नट्याही मुसलमान नट किंवा खेळाडू यांच्याशी विवाह करण्यात मागे नाहीत. उर्मिला मातोंडकर-मोहसिन खान, मोनिका बेदी-कुख्यात अबू सालेम, शर्मिला टागोर-क्रिकेटपटू नबाब पतौडी, क्रिकेटपटू झहीर खान-ईशा शर्वानी समवेत अनेक वर्षे ‘लिव इन रिलेशनशिप’मध्ये राहून नंतर विवाह सागरिका घाडगे हिच्याशी केला, संगीता बिजलानी-क्रिकेटपटू अझरुद्दीन.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला-पायल सिंह. त्यांच्या मुलांची नावे जहीर आणि जमीर अशी आहेत. दोन मुलानंतरही आता उमरने पायलशी घटस्फोट घेण्यासाठी याचिका प्रविष्ट केली आहे. एका हिंदु मुलीशी विवाह करूनही अब्दुल्ला घराण्याने काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात कधी काही केले नाही.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाचे चित्रपट काढण्याच्या मुसलमान अभिनेत्यांच्या हिंदु पत्नीही त्या षड्यंत्राचा भाग बनल्या !

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व खानांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदु धर्मीय बायका असूनही सध्या हिंदी चित्रपटात हिंदु धर्म, देवी-देवता, साधू-संन्यासी, हिंदूंची संस्कृती, इतिहास, ऐतिहासिक स्त्रिया-पुरुष, सण-उत्सव इत्यादींची जाणीवपूर्वक जी अपकीर्ती केली जाते, त्यावर त्या कोणताही प्रतिबंध घालू शकल्या नाहीत; किंबहुना अनेकदा त्याही त्यांच्या नवर्‍यासह हिंदूंना अपकीर्त करण्याच्या षड्यंत्रात सहभागी असतात; म्हणून अमीर खानच्या घटस्फोटीत बायकोला (किरण राव) सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत भारतात रहाणे एकाएकी असुरक्षित वाटू लागले होते. केवळ नट्याच नव्हे, तर ज्या कुणी हिंदु स्त्रिया मुसलमान पुरुषाशी विवाह करतात, त्या सर्वांना मुसलमान चालीरीती, शिकवण, कट्टरता इत्यादी अंगी बाणवून घ्यावीच लागते आणि हे वास्तव आहे.


हे पण वाचा –

♦ ‘लव जिहाद’ रोकनेके उपाय तथा हिन्दू समाजको आवाहन

♦ लव जिहाद : हिन्दू युवतियों, स्त्रियों तथा अभिभावकों के लिए ध्यान में रखनेयोग्य सावधानियां

♦ लव जिहाद : हिन्दू युवतियो, झूठे प्रेमकी बलि चढकर आत्मघात न करो !

♦ ‘लव जिहाद’का प्रसार तेजीसे होनेके कुछ कारण

हे चारही लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/love-jihad

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *