उज्जैन : सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य नव्हे, तर साधी चर्चा करणार्या संतानाही आतंकवादी ठरवले जात आहे. या उलट अन्य पंथातील संत आणि त्यांच्या कुप्रथांविषयक मौन बाळगले जाते. ही स्थिती पालटयला हवी. सनातनचे आणि माझे कार्य एकच आहे.
साधक तीव्र उन्हाळा असतांनाही बाहेर रस्त्यावर उभे राहून लोकांना बोलवतात, हे त्यांचे सर्मपण दाखवते, असे प्रतिपादन द्वाराका आश्रमाचे संस्थापक पू. जगदीश जोशी यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
क्षणचित्र : कुठे ही स्वत:चा सन्मान किंवा छायाचित्र काढून न घेणारे पू. जगदीश जोशी यांनी साधकांना सन्मान आणि छायाचित्र काढण्यास होकार दिला.