कुटुंबातील व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्यास बंदी आणणार
संस्कृतीहीन आणि नैतिकताशून्य असलेले पाश्चात्त्य देश ! पाश्चात्त्यांप्रमाणे वागणारे भारतीय आतातरी हिंदु संस्कृतीची उच्च शिकवण लक्षात घेऊन किमान कृतज्ञता तरी व्यक्त करतील का ? – संपादक
फ्रान्सचे बालसंरक्षण मंत्री एड्रियन टैक्वेट
पॅरिस (फ्रान्स) – वर्ष १७९१ नंतर फ्रान्स सरकारने पहिल्यांदाच कुटुंबातील व्यक्तींसमवेत लैंगिक संबंध ठेवण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. फ्रान्समध्ये व्याभिचाराला मान्यता आहे; परंतु आता यावर पूर्णतः बंदी घालण्याची योजना बनवली जात आहे. याविषयी फ्रान्सचे बालसंरक्षण मंत्री एड्रियन टैक्वेट यांनी ही माहिती दिली.
टैक्वेट यांनी एका मुलाखतीत म्हटले, ‘‘कुठल्याही वयाची व्यक्ती स्वतःचे वडील, मुलगा अथवा मुलगी यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करू शकत नाही. हा वयाचा अथवा मोठ्यांच्या सहमतीचा प्रश्न नाही. आम्ही व्याभिचाराच्या विरोधात लढत आहोत, हे स्पष्ट झाले पाहिजे.’’ तेथील बाल संरक्षण धर्मादायचे अध्यक्ष लॉरेंट बोएट यांनी टैक्वेट यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. वर्ष १९७१ मध्ये फ्रान्सच्या दंड संहितेतून व्याभिचाराला अपराधाच्या श्रेणीतून काढण्यात आले होते. त्यानंतर आता फ्रान्सच्या मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.