Menu Close

Sign Petition : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे आदी बांधून होणारी अतिक्रमणे तात्काळ हटवावी !

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ! छत्रपती शिवरायांनी आई भवानी आणि गुरु यांचा आशीर्वाद; शौर्य, पराक्रम, गनिमीकाव्याची युद्धनीती आदी स्वकर्तृत्व; तसेच महाराजांवर अतूट निष्ठा असलेल्या मावळ्यांच्या त्यागातून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. याच हिंदवी स्वराज्यात महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी बळकावण्याचा ‘लँड-जिहाद’च आहे, असे म्हणावे लागेल.

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंनी या ऑनलाईन याचिकेद्वारा आपल्या मागण्या कराव्या !

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंना विनंती आहे की कृपया खाली दिलेल्या ‘Send Email’ या बटनवर क्लिक करून आपल्या मागण्या इ-मेलद्वारे मा. मुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री, महाराष्ट्रआणि भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक यांना पाठवाव्या ! त्यासह या इ-मेलची एक प्रत (Copy) आम्हाला [email protected] या इमेल पत्त्यावर पाठवावी ! 
(Note : ‘Send Email’ हे बटन केवळ मोबाईलवर क्लिक केल्यानेच कार्यान्वित होते. डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवर चालत नाही !)

Send Email

बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर 100 हून अधिक अनधिकृत आर्सीसी असणारी बांधकामे झाल्याचे हिंदु जनजागृती समितीने एक वर्षभरापूर्वी माहितीच्या अधिकरात उघड केले. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्यासह राज्यभरात आंदोलनही केले; मात्र ती अतिक्रमणे अद्यापही हटवण्यात आलेली नाहीत. हा अतिक्रमणविरोधी लढा चालू असतांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘किल्ले रायगडा’वर अतिक्रमणाच्या माध्यमातून इस्लामी आक्रमण झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्या पाठोपाठ शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत थडगे उभारण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यासह पुणे जिल्ह्यातील लोहगडावर मुसलमानांकडून अनधिकृत बांधकाम करून ‘उरूस’ साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतांना महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षे त्यावर काहीही कृती केलेली नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड-किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे ‘इस्लामीकरण’ करण्याचा घाट घातला आहे. छत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवले, तरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीत. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायला हवेत. या किल्ल्याचे पावित्र्य जपणे आणि किल्ल्याचे संवर्धन करणे, हे शासन तथा भारतीय पुरातत्त्व खाते यांचे दायित्व आहे.

या दृष्टीने किल्ले रायगड, कुलाबा किल्ला, विशाळगड आदींप्रमाणे राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे ही धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरत आहेत. मुळात इतकी अतिक्रमणे होईपर्यंत पुरातत्व विभागाचे कर्मचारी काय करत होते किंवा येथे अतिक्रमणे करण्यासाठी पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांचे काही साटेलोटे तर नाही ना, असा येथे प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि ज्या मुसलमानांनी ही अतिक्रमणे केली, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी आमची मागणी आहे.

मा. खासदार संभाजीराजे आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नातेवाईक श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी या प्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार करून आवाज उठवला आहे. तसेच अनेक दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांनीही आवाज उठवला आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या प्रकरणाची केंद्रीय पथक पाठवून सखोल चौकशी प्रारंभ करावी, अनधिकृत बांधकामे करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावेत, तसेच सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडण्यात यावीत आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे. अन्यथा हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी देशभरात तीव्र आंदोलन छेडेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत, याची गंभीर दखल पुरातत्व विभाग आणि शासन-प्रशासन यांनी घ्यावी. या संदर्भात आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावे, ही विनंती !

[relatednews type=”newstags” count=”8″ terms=”save-forts” show_pagination=”0″]

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *