|
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने अनेक छोट्या पक्षांशी निवडणूक पूर्व युती केली असून राज्यातील काही जागांवर उमेदवारी घोषित केली आहे. त्यामध्ये माजी आमदार नाहिद हसन या गुंडाचा समावेश असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. यासमवेतच ‘दुसरे काश्मीर’ म्हणून नावारूपाला आलेल्या कैराना या गावातील हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्या षड्यंत्राचा ‘मास्टरमाईंड’ (मुख्य आरोपी) म्हणून हसन असल्याचे म्हटले जाते. भाजपने नाहिद हसन याला उमेदवारी देणार्या समाजवादी पक्षाच्या निर्णयाला ‘जिन्नावाद’ म्हटले आहे.
कैराना से हिन्दुओं के पलायन के मास्टरमाइंड गैंगस्टर नाहिद हसन और रफीक अंसारी को सपा ने फिर दिया टिकट, भाजपा ने बताया- ‘जिन्नावाद’#SamajwadiParty #UttarPradeshElection2022 #AkhileshYadavhttps://t.co/jQc3NomXfR
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 14, 2022
नाहिद हसन हा या भागात आमदार राहिला असून त्याची आई तबस्सुम या माजी खासदार राहिलेल्या आहेत. त्या दोघांच्या विरोधात गेल्या वर्षी जानेवारी मासामध्ये पोलिसांनी ‘उत्तरप्रदेश गुंड आणि समाजविरोधी तत्त्वे प्रतिबंधित’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली होती. हसन हा एक मास कारागृहात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
दुसरीकडे पश्चिमी उत्तरप्रदेशातील मेरठ शहरातून समाजवादी पक्षाने रफीक अंसारी या गुंडाला उमेदवारी घोषित केली आहे. त्याच्या विरोधातही अनेक गुन्हे नोंद आहेत.