अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. अजित सुस्वरे
कोल्हापूर – हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या बैठकीत विषय घेऊन या संदर्भातील परिपत्रक काढू. प्लास्टिक ध्वज आणि तिरंगा रंगाचा मास्क यांविषयी ग्रामीण पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देऊ. असा प्रकार कुठे आढल्यास अधिकार्यांना कारवाई करण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी दिले. ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानाच्या अंतर्गत त्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले.
या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. आशा उबाळे आणि माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी व्ही.एस्. ओतारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी परिपत्रक काढून सर्वांना कळवण्याचे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. दीपक कातवरे आणि श्री. अजित सुस्वरे उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. आशा उबाळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, तसेच अन्य
या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करवीर तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार वीपीन लोकरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.