मुंबई – राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू ट्यूब’वरील वाहिनीने १ लाख सदस्यसंख्येचा टप्पा गाठला आहे. धर्मशिक्षण, धर्मरक्षण, धर्मजागृती, राष्ट्र्ररक्षण आणि हिंदूसंघटन या पंचसूत्रांवर आधारित चालू केलेल्या या यू ट्यूबवरील वाहिनीवर नियमितपणे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे व्हिडीओज प्रसारित केल्या जातात. यामध्ये हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेवर आधारित विविध व्हिडीओजचाही समावेश आहे.
यासह कोरोना महामारीच्या काळात बालसंस्कार वर्ग आणि ताज्या घडमोडींवर आधारित ‘धर्मसंवाद’ कार्यक्रमही नियमितपणे प्रसारित केले जात आहेत. आतापर्यंत या वाहिनीवरून प्रसारित केलेल्या व्हिडिओजची दर्शकसंख्या ८३ लाख ४१ सहस्रांहून अधिक आहे.
यू ट्यूबवरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीचे ‘सदस्य’ (सबस्क्रायबर) होण्यासाठी ‘Youtube.com/HinduJagruti’ या ‘लिंक’ला भेट द्या ! |