Menu Close

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

  • बांगलादेशी घुसखोर हे भारतात देशविघातक कारवायांमध्ये गुंतले आहेत, याचे आणखी एक उदाहरण ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • नक्षलवाद्यांचे बांगलादेशी घुसखोरांचे असलेले साटेलोटे पहाता जिहादी आतंकवादाएवढीच नक्षलवाद ही समस्या गंभीर झाली असून त्याच्या निःपातासाठी सरकारने मोहीम राबवणे आवश्यक ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
बांगलादेशी घुसखोर कनिझ फातिमा व नक्षलवादी निवेश कुमार

रांची – नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा करणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला झारखंड पोलिसांनी देहली येथे अटक केली. या महिलेकडून ७१ लाख रुपये रोख रक्कम आणि २ महागड्या चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या. या बांगलादेशी महिलेचे नाव कनिझ फातिमा असे असून ती ७ वर्षांपूर्वी अवैधरित्या भारतात आल्या होत्या.

या महिलेने तिचे नाव पालटून अंजली पटेल असे ठेवले होते. काही काळ तिने बेंगळुरू येथे वास्तव्य केले आणि त्यानंतर ती देहली येथे स्थायिक झाली होती. देहली येथे ती निवेश कुमार या नक्षलवाद्याच्या संपर्कात आली. ती निवेश कुमार याची जवळची सहकारी म्हणून काम करू लागली. निवेश कुमार याला बंदी घालण्यात आलेल्या ‘पी.एल्.एफ्.आय्.’ या प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेला शस्त्रे पुरवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. निवेश कुमार हा बिहारचा रहिवाशी असून तो रांची येथे रहात होता, अशी माहिती रांची पोलीस अधिकार्‍याने दिली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *