Menu Close

‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धर्मांधाची वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांना धमकी !

  • शिरस्त्राण (हेल्मेट) न घालता वाहन चालवल्यामुळे दंड पावती फाडल्यामुळे धर्मांधाचा थयथयाट !

  • पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून दाढी ओढल्याचा धर्मांधाचा कांगावा !

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सत्ता असतांना तेथे उद्दाम धर्मांधांनी पोलिसांना अशा प्रकारे धमकावणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • पोलिसांशी उद्दामपणे वागणारे धर्मांध सामान्य हिंदूंशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
महमंद अशरफ

(संभल) उत्तरप्रदेश – येथील धर्मांध युवक महमंद अशरफ याला चांदौसी चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी अडवल्यावर त्याने वाहतूक पोलीस उपनिरीक्षक हरेंद्रसिंह जाट यांना ‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ भाजपचे नेते संबित पात्रा यांनी त्यांच्या ‘ट्विटर’ खात्यावरून प्रसारित केला आहे.

 

१. १३ जानेवारी या दिवशी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये विनाशिरस्त्राण वाहन चालवणार्‍या महमंद अशरफ याला पोलीस उपनिरीक्षक जाट यांनी अडवल्याचे दिसत आहे.

२. अशरफ याने समाजवादी पक्षाच्या नेत्याला संपर्क करून त्याला पोलिसांशी बोलण्यास सांगितले. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक जाट यांनी अशरफ विनाशिरस्त्राण वाहन चालवत होता; म्हणून दंडाची पावती फाडली. त्या वेळी महंमद चिडला आणि त्याने, ‘दंडाची रक्कम जेवढी वाढवायची असेल, तेवढी वाढवा. तुम्ही मनमानी करत आहात. संभल तुम्ही सोडाल कि आम्ही सोडू, हे येणारा काळच सांगेल.

३. दुसर्‍या दिवशी महंमद यानेही स्वतःचा एक व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांत प्रसारित केला. यात त्याने पोलीस उपनिरीक्षकांवरच मारहाण केल्याचा आणि दाढी ओढल्याचा आरोप केला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *