Menu Close

चर्चच्या पाद्य्राने केला एका अल्पवयीन गरीब मुलीवर बलात्कार, पत्नीने बनवला व्हिडिओ !

मुलीने केलेल्या तक्रारीनंतर दोघांना अटक ! 

  • असाहाय्य लोकांना साहाय्याचा हात पुरवणार्‍या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! अशांपासून सावध रहाण्यासाठी हिंदूंनी स्वधर्मानुसार आचरण करणेच हितावह आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
  • एरव्ही हिंदु साधू-संतांवर काहीही आरोप झाले की, एकजात सर्व प्रसिद्धीमाध्यमे हिंदूंच्या सर्वच संतांवर चिखलफेक करतात, जणूकाही त्यांच्यामध्ये यासाठी चढाओढच लागलेली असते. आता मात्र सर्वची सर्व प्रसिद्धीमाध्यमे कोणत्या बिळात जाऊन लपली आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कणार्वती (गुजरात)  – गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील एका चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाणार्‍या एका १६ वर्षीय मुलीवर तेथील पाद्य्राने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पाद्री या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असतांना त्याच्या पत्नीने या प्रसंगाचा व्हिडिओ बनवला, तसेच मुलीची अश्‍लील छायाचित्रेही काढली.

बलात्काराची ही घटना मे २०२१ मधील असून पोलिसांत तक्रार मात्र २८ डिसेंबर २०२१ मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर पाद्री बळीराम कोकणी आणि त्याची पत्नी अनिता या दोघांना अटक करण्यात आली.

पोलीस तक्रारीत झालेल्या नोंदींनुसार…

१. पीडिता ही शेतात मजुरीचे काम करते. ती तिच्या आई-वडिलांसमवेत प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जात असे. एकदा पाद्री कोकणी याने मुलीला एकटीला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.

२. मुलीने पोलिसांकडे तक्रार करू नये, म्हणून पाद्री कोकणी आणि पत्नी अनिता हे तिला धमकावत असत. सामाजिक माध्यमांत तिचे व्हिडिओ प्रसारित होऊ नयेत, या भीतीपोटी तिने अनेक मास पोलिसांकडे तक्रार नोंदवली नव्हती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *