|
|
बेंगळुरू – अलीकडेच कर्नाटकातील भाजप सरकारने ‘कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय’ उभारण्यासाठी १०० एकर भूमी संमत केली. यानंतर काँग्रेस, जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कर्नाटकातील पुरोगामी यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यास आरंभ केला आहे. रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुका येथे हे संस्कृत विश्वविद्यालय उभारण्यात येणार आहे. मागडी शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. बेंगळुरूची स्थापना करणारा राजा केंपेगौडा यांचे हे जन्मस्थान आहे. केंपेगौडा यांनी मागडी शहरात ऐतिहासिक काळभैरवेश्वर मंदिर आणि रंगनाथस्वामी मंदिर उभारले होते.
(म्हणे) ‘संस्कृत शिकवून कानडी मुलांना ‘धर्मांध’ बनवण्याचा घाट !’ – ए.एन्. नटराजा गौडा, प्रवक्ते, काँग्रेस
कर्नाटकातील काँग्रेसचे प्रवक्ते ए.एन्. नटराजा गौडा यांनी, ‘कानडी मुलांना संस्कृत शिकवून त्यांना धर्मांध बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. (संस्कृत शिकून किती जण धर्मांध झाले, याची संख्या गौडा सादर करतील का ? संस्कृत शिकून माणूस सुसंस्कृत होतो. संस्कृतचा पराकोटीचा द्वेष करणारे गौडा यांचा धिक्कार करावा, तेवढा थोडाच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) रामनगर जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्याऐवजी तेथे ‘बेकार’ संस्कृत विश्वविद्यालयाच्या उभारणीसाठी सरकार प्रयत्न करत आहे’, असे ट्वीट केले आहे.
ट्विटरवर संस्कृतच्या विरोधात दुष्प्रचार !
काँग्रेसच्या या विरोधामुळे तेथे पुन्हा हिंदीविरोधी वातावरण तापू लागले आहे. ‘कानडी लोकांवर हिंदी भाषा थोपवण्याचे हे षड्यंत्र आहे’, असे तेथील हिंदीविरोधी लोकांचे म्हणणे आहे. सामाजिक माध्यमांवर संस्कृत विश्वविद्यालयाला विरोध होऊ लागला. ट्विटरवर ‘#SayNotoSanskrit’ हा हॅशटॅग ट्रेंड (ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) करण्यात आला, तसेच ‘#StopHindiImposition’ हा हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला.
(म्हणे) ‘परकीय भाषांना कर्नाटकात थारा दिला जाणार नाही !’ – पी.एफ्.आय.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)चा कर्नाटकातील प्रमुख यासीर हुसेन याने ‘बसवण्णांच्या (लिंगायत पंथाची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर यांना ‘बसवण्णा’ असे म्हणतात. त्यांचा जन्म कर्नाटकात झाला.) भूमीत ‘परकीय’ भाषांना थारा दिला जाणार नाही. (असे आहे, तर उर्दू भाषाही कर्नाटकासाठी ‘परकीय’ आहे. त्याविषयी हुसेन यांनी सांगावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘संस्कृत आणि हिंदी भाषा लादण्याच्या या प्रकाराला कानडी लोकांनी विरोध करावा. आपल्या पूर्वजांनी कन्नड भाषेसह येथील परंपरा जोपासली आहे. (कर्नाटकात जी काही परंपरा जोपासली गेली, ती तेथील बहुतांश हिंदूंच्या पूर्वजांनी हिंदु धर्मासाठी केलेला त्याग आणि बलीदान यांमुळे जोपासली गेली आहे. त्याचे श्रेय आतंकवादी संघटनेच्या सदस्याने घेऊ नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
कर्नाटकमध्ये संस्कृत विश्वविद्यालय वर्ष २०१० पासून चालू आहे; मात्र निधीअभावी त्याला स्वतंत्र अस्तित्व नव्हते. हे विश्वविद्यालय एका इमारतीत चालू होते. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मगडी शहरात यासाठी १०० एकर भूमी संमत करण्यात आली. या विश्वविद्यालयाच्या बांधकामासाठी ३२० कोटी रुपये खर्च होणार आहेत. ३ जानेवारी २०२२ या दिवशी या विश्वविद्यालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात