Menu Close

लोहगड (जिल्हा पुणे) येथे अवैधपणे दर्ग्यावर चादर चढवली !

  • वैध मार्गाने तक्रारी करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना नोटिसा !

  • हाजी उमरशहावली ट्रस्टच्या सदस्यांसह स्थानिक पोलिसांची उपस्थिती !

ऐतिहासिक वास्तूंचे इस्लामीकरण करणार्‍यांना आणि त्यांना रोखण्याऐवजी त्यांच्या कारवायांना खतपाणी घालणार्‍या पोलिसांवर अन् पुरातत्व विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पुणे – लोहगड हे ‘संरक्षित स्मारक’ असून तिथे धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. महाराष्ट्रातील अनेक गडांवर सध्या होत असलेले इस्लामी आक्रमकांचे अतिक्रमण पहाता जागृत हिंदुत्वनिष्ठ हे गडांवर होणार्‍या अनधिकृत बांधकामाविषयी पोलीस, तसेच पुरातत्व विभाग यांना रितसर तक्रारी करून इस्लामी आक्रमण रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘लोहगडावरही दर्ग्याचे अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, तसेच गडावर अनधिकृतपणे उरूस (मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या कबरीवर नवे वस्त्र चढवण्यासाठी केली जाणारी यात्रा) साजरा करण्याचे आयोजन केले जात आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले होते. याविषयीही हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासन, तसेच पुरातत्व विभाग यांना कळवले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या वाढत्या विरोधामुळे पोलिसांनी त्यांनाच नोटिसा बजावल्या. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे लोहगडावर उरुसाचे मोठ्या प्रमाणात आयोजन न करता स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत १७ जानेवारी या दिवशी हाजी उमरशहावली ट्रस्टच्या ५ सदस्यांनी येथील अवैध दर्ग्यावर चादर चढवली. (पोलीस प्रशासन मुसलमानांच्या अवैध कृतींना आळा घालण्याऐवजी त्यांना दर्ग्यावर चादर चढवता यावी, यासाठी गडाचे दरवाजे उघडते. याउलट वैधपणे तक्रार करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना नोटिसा देते ! – संपादक)

या कृतीमुळे केंद्राकडून आलेल्या आदेशानुसार मुंबई पुरातत्व विभागाने उरूस साजरा न करण्याविषयी दिलेल्या आदेशाचे पोलीस आणि अवैधरित्या चादर चढवण्यात सहभागी व्यक्ती यांच्याकडून एक प्रकारे उल्लंघनच झाले आहे.

(हिंदूंनो, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी पोलीसच कायदा मोडून त्यांना सहकार्य करतात, हे लक्षात घ्या आणि हिंदुहितासाठी आताच संघटित व्हा ! – संपादक) पोलीस एकीकडे लोहगडावर होणार्‍या अवैध प्रकारांना संयतपणे विरोध करत असतांना त्यांना नोटिसा बजावणारे पोलीस गडावरील धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या अवैध कृतींना खतपाणी घालत आहेत. यामुळे सामान्यजनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हिंदुत्वनिष्ठांचा विरोध होऊ नये; म्हणून पोलिसांनी दाखवलेला कावेबाजपणा !

‘हिंदुत्वनिष्ठांचा उरुसाला विरोध आहे. तरीही पोलिसांनी चादर चढवायला दिल्याच्या प्रकाराला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध होऊ शकतो’, हे लक्षात घेऊन पोलिसांनी कावेबाजपणे स्थानिकांकडून लोहगडावरील शिवमंदिरात हिंदूंकडून पूजन करवून घेतले. (हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर ‘हिंदूंनीही पूजा केली’, असे निदर्शनास आणून पोलीस हिंदुत्वनिष्ठांचा आवाज बंद करू पहात आहेत. असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक) या प्रकरणामुळे हिंदुत्वनिष्ठांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *