Menu Close

काँग्रेसी पालकमंत्र्यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या मालवणी (मुंबई) येथील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव !

  • भाजपसह स्थानिकांचाही टिपू सुलतानच्या नावाला विरोध !

  • पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते आज उद्घाटन

  • सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली देशावर आक्रमण करणार्‍या क्रूर धर्मांध आक्रमकांचे उदात्तीकरण आणखी किती दिवस सहन करायचे ? – संपादक
  • इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण करणार्‍या काँग्रेसला हिंदूंनी इतिहासजमा केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक

मुंबई – हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मालवणी येथील एका क्रीडासंकुलाला देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे बांधण्यात आले असून २६ जानेवारी या दिवशी त्यांच्याच हस्ते या क्रीडासंकुलाचे लोकार्पण होणार आहे. भाजपसह स्थानिकांनी टिपू सुलतानाच्या नावाला विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्यात येणार असल्याचे भाजपने घोषित केले आहे.

१. ‘या नामकरणाचा कोणताही ठराव करण्यात आलेला नाही. ही मोगलाई आहे का ? हिंदूंच्या सामूहिक हत्या करणार्‍यांचे उदात्तीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ?’, असा प्रश्न भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

२. क्रीडासंकुलाला टिपू सुलतान याचे नाव दिल्याने सामाजिक माध्यमांवरून विविध स्तरांतील नागरिकांनी संबंधितांवर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

३. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या एका मुसलमान नगरसेविकेने गोवंडी येथील एका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी केली होती. त्या वेळीही भाजपने विरोध केला होता, तसेच शिवसेनेनेही काम अपूर्ण असल्याने नाव देता येणार नसल्याची भूमिका घेतली होती.

४. क्रूरकर्मा टिपू सुलतानाच्या उघडपणे चालू असलेल्या उदात्तीकरणाविषयी मुंबईकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक हिंदूंना हद्दपार करण्याचा हा डाव ! – आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष, भाजप

मुंबईसह राज्यभरात काही विशिष्ट समाजघटकांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करत आहे. मालाड-मालवणी भागांत मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. हिंदूंसह अन्य कुठल्याही घटकाला हद्दपार करण्याचे सत्ताधार्‍यांचे मनसुबे आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही.

मालवणी परिसरात हिंदु आणि बौद्ध समाज भीतीच्या सावटाखाली जगत आहे ! – शुभांगी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या, मालवणी

मालवणी-मालाड या भागांत मागील काही कालावधीपासून हिंदू आणि बौद्ध यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. आमची घरे, इमारती, मालमत्ता या ठिकाणी असुरक्षित झाली आहेत. काही घटकांमुळे आमच्या जिवालाही आता धोका निर्माण झाला आहे. या परिसरात हिंदु आणि बौद्ध समाज भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.

आक्रमकाचे नाव देण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान असलेल्यांची नावे द्यावीत ! – दीपक कांबळे, स्थानिक नागरिक

टिपू सुलतान हा एक आक्रमक होता. तो हिंदुविरोधी होता. त्यामुळे अशांची नावे देण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सदैव श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पराक्रमी पहिले बाजीराव पेशवे, चिमाजीअप्पा यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे.

क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये !

हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन !

हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ? – संपादक 

मुंबई – हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला दिले, तर उद्या औरंगजेब, बाबर, खिलजी, महंमद गझनी, महंमद घोरी, तैमूरलंग, तुघलक आदी क्रूर मोगलांची नावे देण्याची मागणी पुढे येऊ शकते. त्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे मंत्रालयात दिले आहे. या निवेदनावर विक्रोळी येथील श्रीशिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, धारावी येथील श्रीराम गणेश मित्रमंडळाचे श्री. कांतीलाल पटेल, हिंदु राष्ट्र सेना महामुंबईचे अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, तसेच श्री. साहिल जाधव  आदींनी स्वाक्षरी केली आहे. या निवेदनाची प्रत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावेही देण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. मुंबईतील विविध स्थळांना विविध जाती-पंथांतील महनीय व्यक्तींची नावे आहेत. त्यांना  आम्ही कधीही विरोध केला नाही; मात्र ज्याने दक्षिण भारतातील हिंदूंची १ सहस्र मंदिरे पाडली, लाखो हिंदूंच्या हत्या केल्या, लाखो हिंदु महिलांवर अत्याचार केले, तसेच तलवारीच्या बळावर लाखो हिंदूंचे धर्मांतर केले, अशा क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव मुंबईतील क्रीडासंकुलाला देणे, हे हिंदूंच्या भावना दुखावण्यासारखे आहे. हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. हिंदु समाज हे कदापि सहन करणार नाही.

२. सर्व धर्मांना समान वागणूक देऊन आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे ? आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान कुठे ? हा भेद सरकारला करता यायला पाहिजे.

३. महाराष्ट्र क्रूर मोगलांच्या अत्याचाराने त्रस्त असतांना छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेचे रक्षण केले. मंदिरांचा जीर्णोद्धार आणि माता-भगिनींचे शीलरक्षण केले. त्याच्या अगदी उलट वर्तन क्रूर टीपू सुलतानने केलेले आहे.

४. त्यामुळे हा केवळ हिंदु समाजाचा नव्हे, तर महाराष्ट्र घडवणार्‍या छत्रपती शिवरायांचाही अवमान आहे. त्यामुळे अशा अत्याचारी टिपू सुलतानचे नाव एका उद्यानाला कदापि देऊ नये. उद्यानाला त्याचे नाव दिले, तर त्याच्या अत्याचाराला समर्थन आणि प्रोत्साहन दिल्यासारखे होईल.

५. मुंबईचा एकोपा आणि सर्वधर्मसमभाव अबाधित रहाण्यासाठी या क्रीडासंकुलाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव देता येईल; मात्र क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध होईल, तसेच समस्त हिंदु समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *