पोलिसांना असे आदेश का द्यावे लागतात ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? राष्ट्रप्रेमींनो ॲमेझॉनवर बहिष्कार घाला ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत. यापूर्वीही या आस्थापनाकडून राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे बूट, पायपुसण्या, टॉयलेट सीट कव्हर, मास्क आदींची विक्री करण्यात आली होती. याविषयी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली आहे.
प्रथम दृष्टया यह मामला ध्वज संहिता का उल्लंघन प्रतीत होता है जो पीड़ाजनक है।
राष्ट्र का अपमान किसी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा।2/2
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) January 25, 2022
गृहमंत्री मिश्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण ध्वजसंहितेच्या उल्लंघनाचे दिसत आहे, जे दुःखदायक आहे. अशा प्रकारे राष्ट्राचा अवमान सहन करता येणार नाही. यापूर्वी चपलांवरही राष्ट्रध्वज छापण्यात आले होते.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात