Menu Close

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, चित्रपटावर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

इतर वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गुणगान करणारे काँग्रेसवाले या चित्रपटावर मात्र बंदी घालण्याची भाषा करतात ? ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ? – संपादक

मुंबई – ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मोहनदास गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच म्हणजे ३० जानेवारी या दिवशी ओटीटी (आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’ असेही म्हणता येईल.) आणि चित्रपटगृह येथे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मोहनदास गांधी यांची हत्या करणारा राष्ट्रभक्त नथुराम गोडसे याच्यावर आधारित असून त्यात गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात येते, असे दाखवण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे. (अनेक अभिनेते आणि खासदार शरद पवार यांनीही या चित्रपटाला विरोध करू नये, अशीच भूमिका घेतली आहे. त्याविषयी पटोले यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

(सौजन्य : Limelight – Media)

नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे की,

मोहनदास गांधी यांच्या विचारांनी संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. भारतालाही गांधी यांच्या नावाने जगभरात ओळखले जाते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून भारत जिंकता येतो, हे गांधींनी आपल्या स्वातंत्र्यातून दाखवून दिले आहेत.

गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या देशात अशांतता, द्वेष आणि हिंसाचार दाखवणारा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे ‘फॅसिस्ट’ वृत्तीला बळ मिळेल. (धर्मांध देशभर प्रतिदिन करत असलेल्या आतंकवादी कृत्यांविषयी पटोले कधी चकार शब्द काढत नाहीत ! – संपादक) कोणत्याही घृणास्पद आणि अमानवी कृत्याला प्रोत्साहन देणे, हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील चित्रपटगृहे आणि ओटीटी यांवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये. (भारतीय संस्कृतीवर एवढे आघात होत असतांना पटोले चकार शब्दही काढत नाहीत. पटोले यांना सोयीनुसार भारतीय संस्कृतीची आठवण होते, हे लक्षात घ्या ! – संपादक)

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *