दर्शनासाठी जाणार्या हिंदूंवर दबाव टाकून धर्मांध करत आहेत उद्दामपणा !
|
ठाणे – हिंदूंचे शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाच्या नावे करून हिंदूंचे पवित्र क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न धर्मांधांनी चालू केला आहे. स्वत:ची लोकसंख्या वाढवून या संपूर्ण गडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून चालू आहे, तसेच स्वत:चा दबावगट निर्माण करून दर्शनासाठी येणार्या हिंदूंना घाबरवण्याचे प्रकार धर्मांधांकडून करण्यात येत आहेत.
१. श्री मलंगगडावर नवनाथांपैकी सात नाथांच्या समाध्या आहेत, तसेच नाथपंथीय साधू मलंगबाबा यांचे समाधीस्थान आहे. सध्या श्री मलंगबाबा यांची समाधी असलेली संपूर्ण जागा धर्मांधांनी बळकावली आहे.
२. ‘श्री मलंगबाबा’ यांच्या समाधीवरच ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ यांच्या नावाचा दर्गा उभारून ‘श्रीक्षेत्र मलंगगडा’चे नाव ‘हाजी मलंग’ असे प्रचलित करण्यात आले आहे.
३. या दर्ग्यात मूळ समाधीच्या बाजूला धर्मांधांनी अजून एक थडगे बांधले असून ते हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा यांची मुलगी फातिका हिचे असल्याचे सांगितले जात आहे.
४. या गडावर वर्ष १९८९ पर्यंत हिंदूंची किमान १०० घरे होती. सध्या मात्र गडावर हिंदूंची काहीच घरे शिल्लक आहेत. गडावरील धर्मांधांचे वाढते अतिक्रमण भविष्यात गडावरील हिंदूंच्या अस्तित्वाला धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
समाधीस्थळाचे अस्तित्व पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न !
समाधीस्थळावरच उभारण्यात आलेल्या दर्ग्याच्या ठिकाणी श्री मलंगबाबांच्या नावाचा एकही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे गडावर प्रथमच जाणार्या हिंदूंना ‘नेमकी श्री मलंगबाबांची समाधी कोणती ?’, हे लक्षातही येत नाही. दर्ग्याच्या बाजूची सर्व जागा धर्मांध दुकानदारांनी घेरली आहे. दर्शनासाठी येणार्या हिंदूंनी समाधीस्थळ किंवा मंदिर याविषयी विचारणा केल्यास गडावरील धर्मांध दुकानदार श्री मलंगबाबांची समाधी किंवा मंदिरे यांविषयी काहीही माहिती देत नाहीत. उलट त्या ठिकाणी दर्गाच असल्याचे सांगतात. उलट या ठिकाणी श्री मलंगबाबांची समाधी किंवा हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र आहे, याविषयीची माहिती देणारी पुस्तिका येथे उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रथमच जाणारे हिंदू संभ्रमित होत आहेत.
हिंदु भाविकांना चादर विकण्याच्या निमित्ताने दर्ग्यात जात असल्याचे बिंबवण्यात येते !
श्री मलंगगडाच्या पायथ्यापासून ते समाधीस्थळापर्यंत धर्मांधांनी शेकडो दुकाने थाटली आहेत. गड चढायला लागल्यावर पहिल्या दुकानापासूनच धर्मांध दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर घेण्याचा आग्रह करतात. या उलट श्री मलंगबाबांच्या दर्शनासाठी फुले घेऊन जाण्यासाठी हिंदूंच्या एकाही दुकानातून सांगितले जात नाही. त्यातून गडावर जाणार्यांना हा दर्गा असल्याचे पद्धतशीरपणे बिंबवले जात आहे.
भूमी वक्फ मंडळाच्या नावे करून श्रीक्षेत्र मलंगगड बळकावण्याचा प्रयत्न !
वर्ष २००४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात श्रीक्षेत्र मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाची असल्याचे सरकारने घोषित केले. शिवसेनेचे नेते आणि आताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अन् दिनेश देशमुख यांनी याविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाने ही भूमी वक्फ मंडळाकडे देण्याच्या निर्णयाला स्थगिती आहे. न्यायालयाची स्थगिती असतांना या खटल्यातील प्रतिवादी नासीर खान फाजल खान यांनी श्री मलंगगडाची भूमी वक्फ मंडळाच्या नावे करण्यासाठी पुन्हा अर्ज केला. त्यानंतर धर्मादाय आयुक्त आणि राज्य सरकार यांनीही जमीन वक्फ मंडळाकडे हस्तांतरित केली. या विरोधात हिंदूंनी न्यायालयात पुन्हा याचिका केली आहे.
धर्मांधांनी अशा प्रकारे केले गडावर अतिक्रमण !
पेशव्यांच्या काळात या क्षेत्राच्या देखभालीचे दायित्व केतकर नावाच्या सरदारांकडे दिले होते. वर्ष १९२८ ते १९३५ या कालावधीत या स्थानाची व्यवस्था गं.भा. आत्याबाई यांच्याकडे होती. गडावर अनेक भाविक दर्शनासाठी येत, त्यामध्ये मुसलमानांचाही समावेश होता. मुसलमानांच्या सोयीसाठी येथे एक मशीद बांधण्यात आली. त्यानंतर धर्मांधांनी श्रीक्षेत्र मलंगगडाचा उल्लेख ‘हाजीमलंग’ करण्याचा प्रारंभ केला. त्यानंतर येथे सेवेसाठी असलेल्या धर्मांधांनी या जागेचे वहिवाटदार असल्याचा बनाव करून गडावर अतिक्रमण केले. केतकर कुटुंबियांचे वंशज गोपाळ केतकर यांनी ‘श्री पीर हाजी मलंगसाहेब दर्गा’ या नावाने ट्रस्ट स्थापन केला. त्यानंतर आता ट्रस्टमधील धर्मांधांकडून ही जागा वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. वर्ष १९८२ मध्ये पू. मोहनदादा गोखले, वामनराव वाघ आणि पांडुरंग साळुंखे यांनी श्री मलंगगड हे हिंदूंचे तीर्थ असल्याचा दावा अन् छायाचित्रासह सर्व पुरावे ठाणे जिल्हा न्यायालयात सादर केले.
श्रीक्षेत्र मलंगगडाच्या रक्षणासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले प्रयत्न !
या गडावरील मंदिरांच्या माहितीविषयीची कागदपत्रे उपलब्ध व्हावीत, यासाठी वर्ष १९८० मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: धर्मादाय आयुक्तांची भेट घेतली होती. पुढे शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्रीक्षेत्र मलंगगडाच्या रक्षणासाठी उभारलेल्या लढ्याचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांनी ‘हिंदु मंचा’ची स्थापना केली.
विविध हिंदु संघटनांच्या संघटित कार्यामुळेच गडावरील हिंदू सुरक्षित !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, वाल्मीकि समाज, हिंदु महासभा आदी विविध संघटनांच्या कार्यकत्यांनी ‘श्री मलंग जागरण’ नावाने संघटन केले आहे. श्री मलंग जागरणच्या वतीने हिंदूंचे सर्व सण गडावर जाऊन साजरे केले जातात, तसेच प्रत्येक पौर्णिमेला गडावर जाऊन श्री मलंगबाबांच्या समाधीची हिंदूंच्या धार्मिक पद्धतीने पूजा केली जाते. कल्याण येथील ‘सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट’चे संस्थापक पू. मोडक महाराज भक्तगणांसह गडावर जाऊन समाधीची यथासांग पूजा आणि आरती करतात.
हिदूंनो, भविष्यात कोणत्याही गडाचा ‘हाजी मलंग’ होऊ नये, यासाठी दक्ष रहा !
सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील अनेक गड आणि दुर्ग, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी थडगी बांधून धर्मांधांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार पुढे आला आहे. श्रीक्षेत्र मलंगगडावर अतिक्रमणाचा असाच प्रारंभ झाला होता. आता या गडावर धर्मांध बहुसंख्य झाले असून गडावरील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदु जागृत होईपर्यंत अख्खा गड मुसलमानांच्या कह्यात गेला आहे. यामध्ये प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून धर्मांधांना सहकार्य मिळत आहे, असे वाटते. आज श्रीक्षेत्र मलंगगडाची दूःस्थिती ही हिंदूंच्या निद्रिस्तपणाचा परिणाम आहे. भविष्यात असाच निद्रिस्तपणा केल्यास या गडासारखी अनेक क्षेत्रे धर्मांध बळकावतील, हे हिंदूंनी लक्षात घेऊन वेळीच संघटित व्हावे !
श्रीक्षेत्र मलंगगडाचे धार्मिक महत्त्व !या गडावर नाथ संप्रदायाचे संस्थापक श्री मत्स्येंद्रनाथ आणि नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांची मंदिरे आहेत. यासह जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसह नवनाथांपैकी अन्य ५ नाथांच्या समाध्या आहेत. गडावर शिव, गणेश आणि श्री दुर्गादेवी यांची मंदिरेही आहेत. श्रीक्षेत्र मलंगगड हे पूर्वापार श्री नाथसंप्रदायातील साधूंचे साधना केंद्र मानले जाते. |