Menu Close

श्रीक्षेत्र मलंगगडानंतर त्याच्या बाजूचे पहाडेश्वर आणि कार्तिक गणेश पर्वत (जिल्हा ठाणे) बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

  • पहाडेश्वर पर्वतावरील शिवपिंडी आणि नंदी फेकून त्या ठिकाणी बांधली थडगी !

  • ११ थडग्यांच्या अवैध बांधकामांकडे वनविभागाचे दुर्लक्ष !

  • गड-दुर्गांचे होत असलेले इस्लामीकरण रोखण्यासाठी हिंदूंनो संघटित व्हा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 
  • दिवसेंदिवस धर्मांधांकडून गड आणि पर्वत बळकावण्याचे प्रयत्न होणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात प्रशासन अन् पोलीस यांना लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

पर्वतावर अवैधरित्या बांधण्यात आलेली थडगी

ठाणे – श्री नवनाथांचे स्थान असलेले श्रीक्षेत्र मलंगगड बळकावल्यानंतर आता त्याच्या बाजूला असलेल्या पहाडेश्वर पर्वतावरही धर्मांधांनी हात-पाय पसरायला प्रारंभ केला आहे. पर्वतावर ९ आणि गडाखाली २ थडगी उभारून या ठिकाणी धर्मांधांनी धार्मिक स्थळ निर्माण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्वतावरील पुरातन शिवपिंडी आणि नंदी फेकून देऊन त्या ठिकाणी ही ९ थडगी बांधण्यात आली आहेत. धर्मांधांच्या या अवैध बांधकामाकडे वनविभाग दुर्लक्ष करत असून हा प्रकार वेळीच न रोखल्यास भविष्यात श्रीक्षेत्र मलंगगडाप्रमाणे पहाडेश्वर पर्वतही धर्मांध बळकावतील, असा धोका निर्माण झाला आहे.

धर्मांधांनी फेकून दिलेली शिवपिंड आणि नंदी यांची त्या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी स्थापना केली

पहाडेश्वर पर्वत ताहुली (जिल्हा ठाणे) येथे आहे. श्रीक्षेत्र मलंगगडाला लागूनच या पर्वताचा उंच सुळका (टोकदार शिखर) आहे. या गडावर पुरातन शिवमंदिर आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला. काही स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी धर्मांधांनी फेकून दिलेली शिवपिंडी आणि नंदी यांची त्यांच्या मूळ जागेपासून काही अंतरावर पुनर्स्थापना केली आहे.

धर्मांधांकडून पहाडेश्वर पर्वताचे ‘दादी माँ पर्वत’, तर कार्तिक-गणेश पर्वताचे ‘पाच पीर पर्वत’ असे नामकरण !

धर्मांधांकडून पहाडेश्वर पर्वताचे ‘दादी माँ पर्वत’, तर कार्तिक-गणेश पर्वताचे ‘पाच पीर पर्वत’ असे नामकरण प्रचलित करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र मलंगगडाचे ‘हाजी मलंग’ असे नाव प्रचलित केल्यानंतर त्याच पद्धतीने नावे पालटून आता बाजूचे पर्वतही बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत.

हिरवे ध्वज उभारून पर्वताचे इस्लामीकरण !

पर्वतावर पक्के बांधकाम करून उभारण्यात आलेला हिरवा ध्वज

धर्मांधांनी या पर्वतावर उंच लोखंडी पाईपवर २ हिरवे ध्वज उभारले आहेत. त्यासाठी पक्के बांधकाम करण्यात आले आहे. पर्वतावरील सर्व थडग्यांना हिरव्या चादरी चढवून पर्वताचे इस्लामीकरण करण्यात आले आहे.

११ थडगी बांधूनही वनविभागाचे दुर्लक्ष !

पहाडेश्वर पर्वतावर बाजूबाजूलाच धर्मांधांनी ९ थडगी बांधली आहेत. ठराविक कालावधीनंतर थडग्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. या सर्व अवैध बांधकामाकडे वनविभाग दुर्लक्ष करत आहे. वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आता मुख्य पर्वताच्या खालीही धर्मांधांनी २ थडगी बांधली असून एकूण संख्या ११ वर गेली आहे. ती वाढण्याचा धोका आहे.

पर्वतावरील रामबाबांच्या समाधीवर हिरवी चादर चढवून पर्वतावर दर्गा उभारण्याचे षड्यंत्र !

पहाडेश्वर पर्वतावर साधूपुरुष रामबाबा यांची समाधी आहे. समाधीच्या ठिकाणी त्यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे. हिंदु साधूंची समाधी असूनही धर्माधांनी त्यावर हिरवी चादर चढवली आहे. या समाधीच्या बाजूला धर्मांधांनी अन्य एक थडगे उभारले आहे. तेथे दर्गा (मुसलमानांच्या सिद्धपुरुषांचे समाधीस्थळ) उभारण्याचे त्यांचे षड्यंत्र आहे.

‘हाजी मलंग’ प्रमाणे ‘हाजी पहाडेश्वर’ होण्याचा धोका !

श्रीक्षेत्र मलंगगड येथे प्रथम काही धर्मांध दर्शनासाठी येत होते. त्यानंतर त्यांनी श्रीमलंगबाबा यांच्या समाधीवर अतिक्रमण करून ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ याचा दर्गा असल्याचा अपप्रचार केला. या गडावर श्रीमलंगबाबा यांची समाधी नसल्याचे सांगून दर्शनासाठी जाणार्‍या हिंदूंना धर्मांधांकडून घाबरवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. असाच प्रकार आता पहाडेश्वर पर्वतावर चालू झाला आहे. हा प्रकार वेळीच रोखला नाही, तर ‘हाजी मलंग’प्रमाणे ‘हाजी पहाडेश्वर’ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

भविष्यात दर्गा उभारून भव्य धार्मिक स्थान करण्याचे धर्मांधांचे प्रयत्न चालू !

पर्वतावर रोषणाई आणि ध्वनीक्षेपक लावण्यासाठी नेलेला ‘जनरेटर’

या पर्वतावर धर्मांधांनी वजनाने अतिशय जड असलेला एक ‘जनरेटर’ नेऊन ठेवला आहे. या जनरेटरच्या आधारे पर्वतावर रोषणाई करण्यात येते, तसेच ध्वनीक्षेपक लावण्यात येतो. या ठिकाणी धर्मांधांनी जत्रा, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम चालू केले असून भविष्यात या ठिकाणी दर्गा उभारून भव्य धार्मिक स्थान निर्माण करण्याचे त्यांनी षड्यंत्र रचले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *