चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. तरी धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याविषयी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसील कार्यालयात देण्यात आले.
हे निवेदन तहसील कार्यालयात विलास पाटील यांनी स्वीकारले. या प्रसंगी श्रीराम सेनेचे सर्वश्री महंतेश देसाई, प्रताप सूर्यवंशी, गुरुनाथ सुभेदार, तसेच विश्व हिंदु परिषदेचे श्री. रघुराज चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. तेजस गावडे आणि श्री. गणेश मुळीक उपस्थित होते.