Menu Close

कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – श्री. अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

‘कॉन्व्हेंट होत आहेत बळजबरीने धर्मांतराचे केंद्र !’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

तामिळनाडू राज्यातील ‘लावण्या’ नावाची एका शेतकर्‍याची हुशार मुलगी ख्रिस्ती संचालित शाळेत दहावीत शिकत होती. तिच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली. ख्रिस्त्यांकडून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत धर्मांतर करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदू संस्कृती पाळण्यास विरोध केला जात असून सर्व ख्रिस्ती संचालित शाळा धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. याला राजकीय पाठिंबाही मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही या संदर्भात प्रश्‍न उपस्थित केले आहेत, असे प्रतिपादन ‘हिंदु मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीने ‘कॉन्व्हेंट होत आहेत धर्मांतराचे केंद्र !’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘विशेष संवादा’त बोलत होते.

या वेळी श्री. संपथ पुढे म्हणाले की, धर्मांतरामुळे कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील शासन ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे शासन केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. याचा प्रभाव येथील प्रशासनावर आहे. कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायदा पारित झाला आहे. तामिळनाडूमध्येही आम्ही अशी मागणी केली आहे.

या वेळी ‘दी पायोनियर’ या इंग्रजी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार चेल्लप्पन म्हणाले की, ‘लावण्या’ आत्महत्या प्रकरणाची दखल येथील कुठल्याच प्रसिद्धीमाध्यमातून घेण्यात आलेली नाही. शाळेचे नाव, मुलीचे नाव किंवा या घटनेमागे कोण आहे, त्याचे नाव प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेले नाही. येथील मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मार्क्सवादी, ख्रिस्ती आणि मुसलमान धार्जिणे लोक आहेत. त्यामुळे ते धर्मांतरासारख्या वृत्तांना प्रसिद्धी देत नाहीत. ख्रिस्ती आणि मुसलमान कट्टरतावाद्यांच्या वक्तव्यांना येथील प्रसारमाध्यमे लगेच प्रसिद्धी देतात. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्म सर्वांत खतरनाक आहे’, असे विधान केले होते. येथील बाल कल्याण बिगर सरकारी संस्था ख्रिस्ती आणि मुसलमान चालवतात. या संस्थाना मिळणार्‍या विदेश निधीची माहिती सरकारला दिली जात नाही. केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये बालकांवर अत्याचाराच्या खूप घटना घडतात. यामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान आरोपी असेल, तर अशा आरोपींना येथील प्रसिद्धीमाध्यमे पाठिशी घालतात. आता गावेच्या गावेच्या धर्मांतरित केली जात आहेत. ‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’ अशी चुकीची मानसिकता बनविण्यात आली आहे; मात्र आपण हिंदूंसाठी विद्यालय चालू करून आपल्या धर्मात असलेले अमूल्य ज्ञान मुलांना देऊ शकतो. त्यांना चांगले अभियंता, डॉक्टर सिद्ध करू शकतो, असेही श्री. कुमार चेल्लप्पन यांनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *