Menu Close

मालवणी येथील क्रीडासंकुलाचे ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ नामकरण अनधिकृत असल्याने रहित करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अस्लम शेख यांचे पालकमंत्री पद रहित करा !

श्री. सुनील घनवट

मुंबई – मुंबईच्या शिवसेनेच्या महापौरांनी मालाड मालवणीतील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे २७ जानेवारीला घोषित केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही अद्याप हे नामकरण संमत झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘या क्रीडासंकुलाला दिलेले ‘टिपू सुलतान’ हे नामकरण अनधिकृत असल्याने ते प्रथम रहित करण्यात यावे आणि त्या क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वारावर लावलेला या नावाचा फलकही काढून टाकण्यात यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोणताही प्रस्ताव संमत न करताच मालवणी येथील क्रीडासंकुलाला ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नाव देऊन अवैध कृती केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांचे पालकमंत्रीपद रहित केले जावे.


मालाडमधील मैदानाला ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे नाव द्यावे ! – महापौर किशोरी पेडणेकर

महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई – मालाडमधील मैदानाला ‘टिपू सुलतान क्रीडांगण’ असे नाव देण्याचे ठरलेलेच नाही; परंतु त्यावरून भाजपचा मुंबईला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. या मैदानाला ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे नाव द्यावे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मालाडच्या मैदानाला ‘टिपू सुलतान क्रीडांगण’ असे नाव देण्यात येत आहे, असा आरोप करत २६ जानेवारीला भाजपने मुंबईत आंदोलन केले. त्यानंतर त्या बोलत होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *