या आदेशाचे पालन करतांना प्रशासन हिंदूंची मंदिरे सर्वप्रथम पाडतील. त्या वेळी हिंदू विरोध करणार नाहीत; मात्र ज्या वेळी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा ‘पोलीत संरक्षण नाही’, असे सांगितले जाईल ! किंवा ‘कारवाईच्या वेळी प्रशासनावर आक्रमण होईल आणि कारवाई थांबवली जाईल’, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यातील ८ जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच कारवाई केल्यानंतर अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. कारवाई करतांना सतर्क रहाण्यासही सांगण्यात आले आहे. दार्जिलिंग, अलीपूरद्वार, कूचबिहार, कलिम्पोंग, पूर्व मिदनापूर, उत्तर २४ परगणा, दक्षिण दिनाजपूर आणि पूर्व बर्दवान अशी या जिल्ह्यांची नावे आहेत.
#WestBengal government tells DMs of 8 districts asking them to remove “all unauthorised temples and shrines from all public places” https://t.co/vqXSKLnR49
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 28, 2022