प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील संत संमेलनामध्ये शेकडो संतांकडून प्रस्ताव संमत !
वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे. भाजप हा हिंदुत्वनिष्ठ पक्ष असल्याने त्याने जनभावनेचा आदर करत या दिशेने मार्गक्रमण करावे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील बह्मर्षि आश्रमामध्ये माघ मेळ्यानिमित्त आयोजित संत संमेलनामध्ये शेकडोंच्या संख्येने साधू-संत सहभागी झाले होते. यात शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांचाही समावेश होता. या वेळी संतांनी ‘राज्यघटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे, असा प्रस्ताव संमत केला. संतांनी सांगितले की, संत संमेलनाचे लक्ष्य भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवणे आहे आणि इस्लामी जिहादला दूर करणे आहे. देशातील १२५ कोटी जनतेने आता स्वतःच घोषित करावे की, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे.’ त्यांनी आजपासून असे लिहिण्यास प्रारंभ करावा, तेव्हाच या मागणीचे आंदोलन देशभरात पोचेल आणि शेवटी सरकार हे संत अन् हिंदु जनता यांच्या समोर झुकेल.
India should be declared as Hindu nation: Seers at UP Dharma Sansad; watch video#DharmaSansad #Hindu #India #UttarPradesh https://t.co/m7IYxC3rkd
— Free Press Journal (@fpjindia) January 30, 2022
संमेलनामध्ये संतांनी भारतातील मुसलमानांना असणारा ‘अल्पसंख्यांक’ हा दर्जा रहित करण्याचीही मागणी केली. तसेच ‘मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण रहित करावे, आणि देशात धर्मांतरविरोधी कायदा करून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करावी’, असे प्रस्तावही संमत करण्यात आले. अटकेत असणारे यति नरसिंहानंद गिरि महाराज आणि जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना तात्काळ विनाअट मुक्त करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या संतांच्या धार्मिक कार्यक्रमाला अशा प्रकारची आडकाठी आणण्याचा प्रयत्न हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
संतांनी संमेलनात उपस्थित राहू नये, म्हणून प्रशासनाचे प्रयत्न ! या वेळी काही संतांनी आरोप केला की, जिल्हा प्रशासनाने दूरभाष करून ‘संमेलनामध्ये जाऊ नये’, असे सांगितले. तसेच प्रशासनाकडून काही अडथळेही निर्माण करण्यात आले. ‘धर्मसंसद’ नावाने अनुमती देण्यास प्रशासनाच्या नकारामुळे ‘संत संमेलन’ असे नाव ठेवले ! हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या संतांना अशा प्रकारे कार्यक्रमाचे नाव पालटावे लागणे, हे लज्जास्पद ! यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात या संमेलनाचे नाव ‘धर्मसंसद’ ठेवण्यात आले होते; मात्र प्रशासनाने या नावाला आक्षेप घेत अनुमती देण्यास नकार दिल्याने याचे नाव ‘संत संमेलन’ असे ठेवण्यात आले, असे संतांकडून सांगण्यात आले. |