Menu Close

देश सुरक्षित आणि प्रजाहित दक्ष होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

कु. नारायणी शहाणे

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांमध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतामध्ये हिंदु बहुसंख्य असूनही ते असुरक्षित आहेत. मंदिरातील मूर्तींची तोडफोड, मंदिरांचे सरकारीकरण, लव्ह जिहाद, अशा विविध माध्यमांतून हिंदु धर्मावर आघात होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही प्रत्येक व्यवस्थेत संघर्ष करावा लागत आहे. अशी स्थिती असतांना ‘आपला देश प्रजाहितदक्ष आहे’, असे आपण म्हणू शकतो का ? देश सुरक्षित आणि प्रजाहितदक्ष होण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाच्या वेळी त्या बोलत होत्या. सोलापूर जिल्ह्यातील १०० धर्मप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. व्याख्यानाचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन कु. शीतल पारे यांनी केले.

क्षणचित्र

व्याख्यानाच्या शेवटी युवकांना संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चा अर्थ समजून सांगण्यात आला.

अभिप्राय

१. कु. अश्लेषा राजोळ – व्याख्यानाचा विषय पुष्कळ आवडला, तसेच यातून पुष्कळ शिकता आले.

२. श्री. मोहित सांगलुडकर – व्याख्यानामुळे राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्यामध्ये राष्ट्र अन् धर्म यांवरील आघातांविषयी जागृती झाली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *