बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील प्रत्येक गावात ‘गोशाळा’ प्रारंभ करा. प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा उभारली, तरी पुरणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरच नव्हे, तर ग्राम पातळीवर देखील गोशाळा निर्माण केल्या पाहिजेत, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. पुढील सुनावणीच्या वेळी राज्यात गोशाळा उभारण्यासाठी आणि त्या चालवण्यासाठी कोणता आराखडा बनवण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती देण्याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.