Menu Close

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीची  ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

नवी देहली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सहज सोप्या भाषेमध्ये राष्ट्रध्वजाविषयीची माहिती उपस्थितांना दिली.  कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिमरन सचदेवा हिने केले.

‘लायन्स क्लब’च्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन

२५ जानेवारी या दिवशी ‘लायन्स क्लब’च्या वतीने एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर मनिंदर मन उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. मंजुळा कपूर यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अनेक सदस्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे क्लबच्या प्रमुखांनी कौतुक केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *