Menu Close

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

नाव पालटण्याची भाजपची मागणी

गुंटूर (आंध्रप्रदेश) – येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१. गुंटूर शहराच्या महापौर कवेती मनोहर म्हणाल्या की, गेल्या काही आठवड्यांपासून भाजपचे कार्यकर्ते या टॉवरविषयी विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आम्ही परिसरातील मुसलमानांशी बोललो असून टॉवरशेजारी राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. (राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतांना स्थानिक मुसलमानांशी बोलण्याची आवश्यकताच काय ? भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे. ध्वजसंहितेचे पालन करत भारतात कुठेही राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. आंध्रप्रदेश राज्याचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी पत्रकारांना सांगितले की, जीना टॉवरचे नाव पालटेपर्यंत आंदोलन चालूच रहाणार आहे. त्याला तिरंग्याचा रंग दिला, हे ठीक आहे; पण त्याचे नावही पालटले पाहिजे. ज्याप्रमाणे औरंगजेब मार्गाचे नामकरण करण्यात आले, त्याचप्रमाणे या जीना टॉवरचे नामकरण ‘एपीजे अब्दुल कलाम टॉवर’, असे करण्यात यावे, असे ते म्हणाले.

३. प्रजासत्ताकदिनी काही हिंदुत्वनिष्ठांनी याच जीना टॉवरवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले  होते. (गुंटूर हे भारतात आहे की पाकिस्तानात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *