Menu Close

पाकिस्तानमध्ये हिंदु व्यापार्‍याची हत्या

‘भारतात निघून जा’ अशा मिळत होत्या धमक्या !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

घोटकी (पाकिस्तान) – घोटकी जिल्ह्याच्या डहारकी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्‍याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या आक्रमणाच्या वेळी त्यांच्यासमवेत असणारा एक नातेवाईक हरीश कुमार हेदेखील गंभीररित्या घायाळ झाले. दहर समाजातील काही लोकांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी पाकमध्ये एका ख्रिस्ती व्यापार्‍याची हत्या करण्यात आली होती.

१. काही दिवसांपूर्वी सुतान यांनी त्यांना काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगत सुतान यांनी पोलिसांकडे साहाय्याची याचना केली होती. ‘पाकिस्तान हीच माझी मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. येथून मी कुठेही जाणार नाही’, असे सुतान यांनी त्यांना सांगितल्याचे म्हटले होते.

(सौजन्य : Republic World)

२. आक्रमणानंतर घायाळ झालेल्या सुतान यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्यांनी म्हटले, ‘माझ्यावर आक्रमण झाले आहे. भूमीच्या वादातून भाच्यानेच अन्य ४ जणांसहित माझ्यावर आक्रमण केले.’ हा व्हिडिओ प्रसारित होत आहे.

३. सुतान लाल यांच्या हत्येच्या विरोधात या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली. पाकिस्तानातील विरोधी पक्ष ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’च्या नवाज गटाकडून या हत्याकांडाचा निषेध करण्यात आला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *