मदर तेरेसा यांनी समाजसेवेच्या नावाखाली गरीब हिंदूंचे आमिष दाखवून धर्मांतर केले. अशांना संतपद देणारे व्हॅटिकन !
नवी देहली : पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणार्या मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती कॅथलिक्स बिशप्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकार्यांनी दिली. आम्ही पंतप्रधान मोदी यांना भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. त्यावर आपण या निमंत्रणाचा आदर करत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे, असे काऊन्सिलचे उपमहासचिव फादर चिन्नायन यांनी सांगितले.
पोप यांना भारतात येण्याविषयी निमंत्रण देण्यासाठी भारत शासन विशेष अधिकार्याला व्हॅटिकनला पाठवणार असल्याचे मोदी यांनी फादर चिन्नायन यांना सांगितले. (हिंदूंच्या एकातरी शंकराचार्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधानांनी गेल्या दोन वर्षांत काही केले असल्याचे ऐकिवात नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला याविषयी सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे, असे चर्चच्या अधिकार्यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात