फ्रान्स सरकारकडून महिला पत्रकाराला संरक्षण
भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी पत्रकार या महिला पत्रकाराला मिळालेल्या धमकीचा निषेध करतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये वाढत चालेल्या मुसलमानांच्या धर्मांधतेविषयीची माहिती वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दाखवल्यावरून ‘ कॅनाल प्लस’ या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार ओफेली मेयुनीर यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. फ्रान्सचे पंतप्रधान आणि मंत्री यांना संरक्षण देणारी यंत्रणाच ओफेली हिला संरक्षण देत आहे. या कार्यक्रमासाठी त्यांना साहाय्य करणार्या मुसलमान अधिवक्त्यालाही ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ओफेली यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी फ्रान्समधील उत्तरेकडच्या रोबेक्स भागातील परिस्थिती दाखवली होती. फ्रान्समध्ये मुसलमानांची सर्वाधिक संख्या रोबेक्स भागामध्येच आहे.
वाढती इस्लामी धर्मांधता दाखवणाऱ्या फ्रेंच पत्रकाराला ठार मारण्याची धमकी#reporter #opheliemeunier #deaththreats https://t.co/okIyiGHbno pic.twitter.com/PNaxcUhNDb
— Saamana (@SaamanaOnline) February 5, 2022
ओफेली यांनी रोबेक्स भागात जाऊन तेथील चित्रीकरण केले. यात त्यांनी तेथे वाढलेली इस्लामी धर्मांधता दाखवली. येथे लहान मुलांसाठीच्या बाहुल्यांना चेहराच नसतो. येथील उपहारगृहांमध्ये महिला पुरुषांच्या नजरेस पडू नयेत, यासाठी पडदे लावून महिलांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी वाहिनीवरून दाखवल्याने ओफेली यांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.