Menu Close

राष्ट्रीय शिवजी सेनेने ‘वीर मातृदिन’ कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे चेतन गाडी यांच्या आई-वडिलांचा केला सत्कार !

श्री. जनार्दन गाडी आणि सौ. पद्मा यांचा सत्कार करतांना श्री. श्रीनिवास च्यारी

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या त्यांच्या आई जिजाऊमातेच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने ‘वीर मातृदिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने धर्मकार्य करणार्‍या ५ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा समन्वयक श्री. चेतन गाडी यांचे आई-वडील अन् सनातनचे साधक सौ. पद्मा आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. जनार्दन गाडी यांचा सत्कार राष्ट्रीय शिवजी सेनेचे श्री. श्रीनिवास च्यारी यांनी केला. ‘सध्याच्या काळात धर्माला ग्लानी आली आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष घडवणार्‍या जिजामातेचा समाजासमोर आदर्श ठेवणे आवश्यक आहे’, या उद्देशाने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून प्रसारण करण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *