Menu Close

हिंदूंची ‘हिंदु’ म्हणून एकजूट होणे ही काळाची आवश्यकता ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांच्यासाठी विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कु. क्रांती पेटकर

पुणे – भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी बलीदान दिले; मात्र ज्या राष्ट्रपुरुषांनी आणि क्रांतीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचा शौर्यशाली इतिहास आज शिकवला जात नाही. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु म्हणून एकजूट होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मानसी दहीवडकर यांनी केले, तर श्री. वैभव पावसकर यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला.या कार्यक्रमाचा लाभ २०० हून अधिक धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी घेतला.

धर्मप्रेमींचे कृतीशील अभिप्राय

१. सौ. सविता, पुणे – मी योगशिक्षिका असल्याने व्याख्यानातून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच हा संपूर्ण विषय योगवर्गात येणार्‍या महिलांना सांगीन.

२. श्रीमती शकुंतला पवार, पुणे – हिंदु राष्ट्राचा व्यापक विषय जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करीन.

३. श्री. दीपक फाजगे, तालुका भोर – व्याख्यानातील मार्गदर्शन अतिशय चांगले होते. जिहाद टाळण्यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करतांना मी ती हिंदु बांधवांकडूनच घेईन.

४. कु. श्रेयस शिंदे, हडपसर – व्याख्यान प्रेरणादायी आणि विचारांना नवीन दिशा दाखवणारे होते. अशा प्रकारच्या इतर व्याख्यानांतही सहभागी होण्यास मला आवडेल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *