Menu Close

मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी असेल ! – शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार

सर्वच राज्यांनी असा ठोस निर्णय घोषित करणे आवश्यक आहे !

शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील शाळांमध्ये हिजाब घालून येण्यावर बंदी असणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी दिली. ते म्हणाले की, शाळांमध्ये केवळ गणवेशच परिधान करून येणे बंधनकारक असणार आहे. हिजाब गणवेशाचा भाग नसेल. यासाठी शिक्षण विभाग राज्यातील सर्व शाळांचे परीक्षण करणार आहे.

परमार पुढे म्हणाले की, हिजाब हे सूत्र नसून गणवेश हे सूत्र आहे. समानता आणि शिस्त यांसाठी गणवेश आहे. त्यामुळे शाळांमध्ये एकसारखाच गणवेश असणार आहे. जे समुदाय यावरून बोलत आहेत, त्यांना येणार्‍या काळामध्ये पस्तवावे लागणार आहे. हिजाब घर आणि सार्वजनिक ठिकाणी वापरू शकता; मात्र शाळेमध्ये नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *