Menu Close

पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा !

५० सहस्र रुपयांचा दंड

  • पाकमध्ये हिंदूंवर ईशनिंदेच्या प्रकरणात खोट्या तक्रारी प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबले जाते. तेथील हिंदूंना छळण्यासाठी ईशनिंदा कायद्याचा वापर केला जातो. या प्रकरणांची भाजप सरकार नोंद घेणार का ?
  • पाकमध्ये ईशनिंदेवरून गुन्हा नोंदवून शिक्षाही होते, तर भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आल्यावर कुणी साधी तक्रारही करत नाही, तक्रार केली, तरी गुन्हा नोंदवला जात नाही; गुन्हा नोंदवला, तरी कारवाई होत नाही; कारवाई झाली, तरी शिक्षा होणे दूरच रहाते !
  • भारतात हिंदूंच्या देवतांची अश्‍लील आणि नग्न चित्रे काढणार्‍या हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, हे लक्षात घ्या !

हिंदु शिक्षक नौतन लाल

इस्लामाबाद (पाकिस्तान) – कथित ईशनिंदेच्या (देवतेचा अवमानाच्या) प्रकरणी वर्ष २०१९ मध्ये अटक करण्यात आलेले हिंदु शिक्षक नौतन लाल यांना सिंध प्रांतातील घोटकी येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. गेल्या २ वर्षांपासून नौतन लाल कारागृहातच आहेत. त्यांचा जामीनअर्जही दोनदा फेटाळण्यात आला होता. नौतन लाल यांनी सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यातून ईशनिंदा झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

१. वर्ष १९४७ पासून वर्ष २०२१ या काळात पाकमध्ये ईशनिंदेचे १ सहस्र ४१५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच १८ महिला आणि ७१ पुरुषांची या आरोपातून हत्याही करण्यात आली आहे.  ही संख्या याहून अधिक असण्याची शक्यता पाकमधील ‘डॉन’ या वर्तमानपत्राने व्यक्त केली आहे; कारण सर्वच प्रकरणात गुन्हे नोंदवले जात नाहीत.

२. अमेरिकेच्या एका अहवालानुसार पाकच्या कारागृहातील ८० टक्के बंदीवानांवर ईशनिंदेचा आरोप आहे. यांतील निम्म्या बंदीवानांना जन्मठेप किंवा फाशी अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *