Menu Close

हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

‘शाळांमध्ये हिजाबचा आग्रह का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

सध्या चर्चेत असलेल्या ‘हिजाब’ प्रकरणामागे दहशतवादाची पार्श्‍वभूमी असलेल्या विविध देशद्रोही मुसलमान संघटना, पक्ष आणि साम्यवादी आहेत. ‘पहले हिजाब-फिर किताब’ अशी भित्तीपत्रके महाराष्ट्रात मुसलमान पक्ष आणि संघटना यांनी लावली आहेत, यातून त्यांना पहिले इस्लाम, मग शिक्षण हवे आहे, हे स्पष्ट होत आहे. ‘हिजाब’चे निमित्त करून सर्वत्र ‘इस्लामीकरण’ करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे. आज शाळेतील मुसलमान मुलींना पुढे करून मुसलमान संघटना प्रथम मुलींना ‘हिजाब’, मग ‘बुरखा’ घालून येण्यास सांगतील. नंतर हे शाळांमध्ये नमाजपठण आणि त्यासाठी मशिदीचीही मागणी करतील. शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शाळांमध्ये हिजाबचा आग्रह का ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक श्री. प्रशांत संबरगी म्हणाले की, हिजाबचा विषय केवळ कर्नाटकपुरता मर्यादीत नाही, तर हे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. शेतकर्‍यांचे कथित आंदोलन, पुरस्कार वापसी याप्रमाणे सध्याचा ‘हिजाब’च्या विषयावर ट्विटरवय लाखो ट्वीटस् (Tweets) करून त्यात पाकचे पंतप्रधान इम्रान खान, नोबेल पुरस्कार विजेती मलाला, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह गणवेश आणि समानता याचा अर्थ न कळलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सहभागी होणे, यातून हा ‘आंतरराष्ट्रीय अजेंडा’ आहे, हे स्पष्ट होते. जगभरात अनेक इस्लामी देशांत शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था येथे हिजाब, बुरखा यांवर बंदी आहे; मात्र भारतात हिजाबची मागणी का होत आहे ?

दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या विनीता राघव म्हणाल्या की, हिजाबचा विषय आता न्यायालयात गेला आहे. तरीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता मुसलमान लोक आंदोलन करत आहेत. हा न्यायालयासह सर्वांवर दबाब आणण्याचा प्रयत्न आहे. हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा म्हणाले की, कर्नाटकमध्ये शाळेचा गणवेश परिधान न करता मुसलमान मुलींनी हिजाबमध्ये येण्यास प्रारंभ केल्यावर हिंदु मुलींनी त्याला सनदशीर मार्गाने विरोध केला. त्यानंतर हिंदु मुलींवर दगडफेकीच्या घटना घडल्या. काही हिंदु संघटना सोडल्या, तर राजकीय पक्षांसह सर्वांनीच या घटनेविषयी मौन बाळगले. अशा घटनांतून उघडकीस येणारा भारताचे इस्लामीकरण करण्याचा डाव उधळला पाहिजे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *