याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत कि त्यांना इस्लामी देशांपेक्षा अधिक कळते ?
नवी देहली – जगातील काही इस्लामी देशांमध्येही शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाब घालून येण्यास बंदी आहे. ट्यूनीशियामध्ये वर्ष १९८१ पासून, कोसोवो या देशात वर्ष २००९ पासून, अझरबैजानमध्ये वर्ष २०१० पासून, सीरियामध्ये वर्ष २०१० पासून, तर इजिप्तमध्ये वर्ष २०१५ पासून हिजाबवर बंदी आहे. तुर्कस्तानमध्येही बंदी घालण्यात आली होती; मात्र नंतर ती उठवण्यात आली. इंडोनेशिया, मलेशिया, मोरक्को, ब्रूनी, मालदीव आणि सोमालिया या देशांत हिजाब अनिवार्य नाही.