|
उडुपी (कर्नाटक) – येथील कुंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून प्रवेश देण्याची मागणी धर्मांध विद्यार्थिंनींकडून करण्यात येत आहे. येथे सध्या गोंधळाची स्थिती आहे. त्यातच भाग्यनगर (तेलंगाणा) येथून धर्मांध येथे आले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथील परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.
भाग्यनगर येथून सलमान नावाच्या युवकाच्या नेतृत्वाखाली आलेल्या काही धर्मांधांनी ‘राज्यशासन मुसलमानांच्या संदर्भात भेदभाव करत आहे’, असा आरोप केला आहे. ‘शासकीय शाळा-महाविद्यालये आम्ही देत असलेल्या कराच्या पैशांतून चालत असल्याने आमच्या भावनांचा आदर केला पाहिजे.’ (धर्मांधांपेक्षा हिंदू अधिक कर देतात. त्यामुळे त्यांच्या कराच्या पैशांतून धर्मांधांवर होणारी उधळण बंद करण्याची मागणी हिंदू कधी करणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात जाण्यासही सिद्ध आहोत’, असे म्हटले आहे.