Menu Close

जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

  • जर जगातील शक्तीशाली आणि पुरोगामी देश हिजाबवर बंदी घालत असतील, तर पुरोगामी म्हणून ओळख सांगणार्‍या भारतामध्ये हिजाबवर शाळा, महाविद्यालये यांमध्ये बंदी घालण्यास पुरो(अधो)गाम्यांचा विरोध कशाला ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • एरव्ही स्त्रीमुक्ती आंदोलन करणार्‍या महिला संघटना हिजाबच्या विरोधात का बोलत नाही कि त्यांचे धर्मांधांविषयी बोलण्याचे धाडस होत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

नवी देहली – कर्नाटकमधील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून जाण्यास अनुमती देण्यासाठी मुसलमान विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या मागणीसाठी आंदोलनही चालू आहे. याला हिंदु विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये हिजाबवर बंदी आहे. यात फ्रान्स, अमेरिका आदी देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोणत्याही धर्माची वेशभूषा करून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये अनुमती नाही.

फ्रान्समध्ये वर्ष २००४ पासूनच हिजाबवर बंदी

फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश आहे जेथे वर्ष २००४ मध्येच शाळांमध्ये हिजाब घालून येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्या वेळी फ्रान्स सरकारने म्हटले होते, ‘ही वेशभूषा एका धर्माची ओळख दाखवते.’ यानंतर वर्ष २०११ मध्ये फ्रान्स सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी घातली होती. त्या वेळेच्या राष्ट्रपतींनी म्हटले होते की, फ्रान्समध्ये हिजाब घालणार्‍यांचे स्वागत होणार नाही.

वर्ष २०१२ मध्ये रशिया येथेही बंदी

रशियामध्ये वर्ष २०१२ मध्ये शाळांमध्ये हिजाब घालून येणार्‍यावर बंदी घालण्यात आली आहे. याला तेथील सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत ही बंदी कायम ठेवली होती.

चीनमध्येही हिजाबवर बंदी

चीनच्या सध्याच्या शी जिनपिंग सरकारने शाळेत हिजाब घालून येण्यावर बंदी घातलेली आहे. चीनने मुसलमानांच्या पारंपरिक वेशभूषेवरच बंदी घातली आहे. अशी वेशभूषा करून शाळा, सरकारी कार्यालये येथे प्रवेश करण्यास बंदी आहे. इतकेच नाही, तर चीनमध्ये दाढी वाढवण्यावरही बंदी आहे.

ब्रिटनमध्ये धर्माची ओळख दाखवणारी वेशभूषा परिधान करण्यावर बंदी

ब्रिटनमध्ये थेट हिजाबवर बंदी घालण्यात आलेली नसली, तरी शाळांमध्ये गणवेश घालून येणे बंधनकारक आहे. यात धर्माची ओळख दाखवणारी वेशभूषा करण्यास बंदी आहे.

बुल्गेरियामध्ये हिजाबवर संपूर्ण बंदी

संपूर्ण बुल्गेरियामध्ये हिजाब घालण्यावरच बंदी आहे. येथील सरकारने जिहादी आतंकवाद्यांच्या कारवाया पहाता हा निर्णय घेतलेला आहे. (असा निर्णय गेली ३ दशके जिहादी आतंकवाद चालू असतांना भारताने अद्यापपर्यंत का घेतलेला नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो. – संपादक)

डेन्मार्कमध्येही हिजाबवर संपूर्ण बंदी

युरोपमधील डेन्मार्कमध्ये हिजाबवर संपूर्ण बंदी आहे. जर कुणी चेहरा झाकला असेल, तर त्याला १२ सहस्र रुपये दंड आकारण्यात येतो. दुसर्‍यांदा या प्रकरणी पकडण्यात आले, तर ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला जातो.

नेदरलँड आणि बेल्जियम या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

नेदरलँड आणि बेल्जियम या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे किंवा चेहरा झाकणे यांवर बंदी आहे. जर कुणी याचे उल्लंघन केले, तर त्याला दंड भरावा लागतो.

जर्मनीमध्ये कायदेशीर बंदी

जर्मनीच्या संसदेने कायदा करून सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे.

कॅनडामध्ये वर्ष २०१२ पासून बंदी

कॅनडामध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास बंदी आहे. वर्ष २०१२ पासून ही बंदी घालण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *