उज्जैन : पूर्वीपासून देवता आणि असुर यांच्यात संघर्ष चालत आला आहे. त्याप्रमाणे आपल्याला देशात वाढत असलेल्या असुरी शक्तींचा धैर्याने सामना करावा लागणार आहे. देशात लव्ह जिहाद, आतंकवाद यांच्या रूपात आसुरी शक्तींनी ज्या लंका निर्माण केल्या आहेत, त्यांचे बजरंगबलीप्रमाणे दहन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय संयोजक श्री. राजेश पांडेय यांनी येथे नुकत्याच पार पडलेल्या विश्व हिंदु परिषदेच्या हिंदु युवा कुंभ या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला संत श्री रामदास वेदांती, प.पू. हेमलतादिदी यांच्यासह विश्व हिंदु परिषदेचे प्रांत संघटनमंत्री श्री. सोहन, बजरंग दलाचे क्षेत्रीयमंत्री श्री. राजेश तिवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक श्री. पराग अभ्यंकर आदींनी संबोधित केले. या कार्यक्रमात माळवा प्रदेशातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्रशासनाची गोतस्करांशी हातमिळवणी ! – श्री. सोहन, प्रांत संघटनमंत्री, विश्व हिंदु परिषद
माळवा प्रांतात कोणत्याही परिस्थितीत गोमातेच्या रक्षणासाठी बजरंग दल नेहमीच पुढे असते. ज्याप्रमाणे राज्यात गोतस्करी वाढत आहे. त्यावरून शासन आणि प्रशासन यांनी गोतस्करांशी हातमिळवणी केली असावी, असे वाटते; कारण अनेक वेळा गोतस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांना पोलिसांनीच कह्यात घेतले आहे. एवढेच नव्हे, तर गोरक्षकांची हत्या झाल्यावर प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही.
देशाला आज सुपुत्रांची आवश्यकता आहे, कुपुत्रांची नाही ! – श्री. राजेश तिवारी, क्षेत्रीयमंत्री, बजरंग दल
बजरंग दलाने संकल्प केला आहे की, देशात बाबर नावाचे कोणतेही स्मारक, मार्ग किंवा ठिकाण असणार नाही. देशाला आज सुपुत्रांची आवश्यकता आहे, कुपुत्रांची नाही, जे भारतभूमीला माता म्हणत नाहीत, गंगेला माता म्हणत नाहीत आणि वन्दे मातरम् म्हणण्यास नकार देतात. अशा लोकांना या देशात रहाण्याचा कोणताही अधिकार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात