Menu Close

पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांत २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार !

  • भारतात कर्नाटकातील महाविद्यालयात मुलींना हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाक थयथयाट करतो; मात्र पाकमधील एका प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प रहातो. पाकची ही दुटप्पी भूमिका लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • पाकमधील महिलांच्या या स्थितीविषयी जागतिक महिला आयोग, महिलांच्या संघटना, तसेच भारतातील महिला नेत्या का बोलत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांमध्ये २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार आणि ९० जणांची हत्या करण्यात आली, अशी माहिती पंजाब माहिती आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. तसेच ‘अशा घटनांत एक टक्क्याहून अल्प गुन्हेगारांना शिक्षा मिळते’, असेही यात म्हटले आहे. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार पाकमध्ये प्रतिदिन बलात्काराच्या ११ घटना घडतात.

 

१. गेल्या ६ मासांमध्ये पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्येच ४०० महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली, तर २ सहस्र ३०० हून अधिक महिलांचे अपहरण करण्यात आले.

२. वर्ष २०१५ ते वर्ष २०२१ या ६ वर्षांत बलात्कार आणि अपहरण यांच्या २२ सहस्र प्रकरणांची नोंद पोलिसांत करण्यात आली. या २२ सहस्र प्रकरणांपैंकी केवळ ७७ प्रकरणांत आरोपींना दोषी ठरवण्यात आले.

प्रा. निदा किरमाणी

३. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या प्रा. निदा किरमाणी यांनी सांगितले की, पाकिस्तानात लैंगिक शोषणाच्या घटनेतील पीडितेलाच दोषी ठरवले जाते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *