Menu Close

हरिहर (कर्नाटक) येथे ३०० हून अधिक धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु दुकानदाराला मारहाण

व्हॉट्सअ‍ॅपवरून हिजाबविरोधात कथित पोस्ट केल्याचे प्रकरण

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना धर्मांधांकडून अशा प्रकारे मारहाण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा धर्मांधांवर आता कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

हरिहर (कर्नाटक) – येथील मालेबेन्नूर शहरातील गिगाली सर्कलमध्ये दिलीप मालगीमाने यांनी हिजाबच्या विरोधात व्हॉट्स अ‍ॅपवरून कथित पोस्ट पाठवल्याने त्यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. त्यांना दावणगेरे येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. दिलीप यांचे दुकान असून ३०० धर्मांधांच्या जमावाने त्यांना दुकानातून बाहेर काढून मारहाण केली. दिलीप यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून ३ जणांना कह्यात घेतले आहे. या घटनेचा विरोध म्हणून गिगाली सर्कलमधील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *