Menu Close

उडुपी येथील हिजाब प्रकरणामागे ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात !

ओनली फॅक्ट’ या वृत्तसंकेतस्थळाच्या संस्थापकाचा पुराव्यांनिशी दावा

  • मुसलमान मुलींवर अन्याय होत असल्याचा साम्यवादी पत्रकारांकडून गवगवा !
  • धर्मांध आणि साम्यवादी कशा प्रकारे हातात हात घालून कायदाविरोधी अभियान राबवतात, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ या व्यापक उद्देशाने प्रेरित असलेले हिंदू हे देशविरोधी शक्तींच्या विरोधात संघटितपणे अभियान राबवायला केव्हा शिकणार ?
  • कर्नाटक पोलिसांनी या कटामागे असलेल्या संघटना आणि धर्मांध शक्ती यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची अपेक्षा !

नवी देहली – आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची विद्यार्थी शाखा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ (सी.एफ्.आय.) हीच उडुपी येथील हिजाबच्या वादामागे असल्याचा पुराव्यानिशी दावा ‘ओनली फॅक्ट डॉट इन’ या वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि पत्रकार विजय पटेल यांनी केला आहे. त्यांनी विविध ट्वीट्स करून उडुपी येथील ए.एच्. अल्मस, अलिया अस्सादी, आयेशा आणि मुस्कान जैनाब या चार मुलींचा ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’शी आधीपासून असलेला संबंध सोदाहरण स्पष्ट केला. या मुलींनी महाविद्यालयाकडून हिजाबला विरोध झाल्यावर आम्ही ‘सी.एफ्.आय.’ला संपर्क साधला असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले; परंतु त्या ‘सी.एफ्.आय.’शी आधीपासून संपर्कात होत्या किंबहुना त्यांच्या कार्यामध्ये सक्रीय सहभागी असायच्या, हे पटेल यांनी समोर आणले. या मुली हिजाबच्या समर्थनार्थ नेतृत्व करत असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाला साम्यवादी विचारसरणीच्या प्रसारमाध्यमांनी टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे प्रसिद्धी दिली, हेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकार विजय पटेल यांनी केलेल्या ट्वीट्स मध्ये म्हटले आहे की…

१. सप्टेंबर २०२१ मध्ये उडुपी येथील महाविद्यालयांत ‘सी.एफ्.आय.’ने सदस्यवाढीचे अभियान राबवले होते.

२. ऑक्टोबर २०२१ मध्ये वर उल्लेखित चारही मुसलमान मुलींनी त्यांचे ट्विटर खाते उघडून ‘सी.एफ्.आय.’च्या देशविरोधी ट्विटर मोहिमांमध्ये सहभाग घेण्यास आरंभ केला.

३. ‘बाबरी’साठीचा लढा !’, ‘कर्नाटकातील मुसलमान विद्यार्थ्यांवरील आक्रमण !’, ‘अजानच्या समर्थनार्थ उभे रहा !’, ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात पैशांची हेराफेरी करणारा रौफ शरीफ या आरोपीला मुक्त करा !’,  अशा प्रकारच्या ‘सी.एफ्.आय.’कडून चालवण्यात आलेल्या विविध देशविरोधी ट्विटर मोहिमांमध्ये या मुली सक्रीयपणे सहभागी झाल्या.

४. यामध्ये त्यांनी रा.स्व.संघ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना खालच्या थराला जाऊन हिणवणारे ट्वीट्स केले.

५. उडुपी येथील महाविद्यालयाच्या ‘हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश करू नये’, या निर्णयाच्या विरोधात याच मुलींनी २ जानेवारी २०२२ या दिवशी ‘सी.एफ्.आय.’च्या ‘बॅनर’खाली (फलकाखाली) झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधन केले होते.

साम्यवादी पत्रकारांकडून वेळोवेळी वार्तांकन !

‘दी वायर’ आणि ‘अल्-जजिरा’ यांच्या पत्रकार रुश्दा फातिमा खान, ‘दी हिंदुस्थान गझेट’ अन् ‘दी वायर’ यांच्या पत्रकार रबिया शिरीन, ‘दी न्यूज मिनिट’चे पत्रकार प्रज्वल, ‘ऑल्ट न्यूज’चे महंमद जुबेर आणि नंतर एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनी या सर्व साम्यवादी पत्रकार अन् वृत्तवाहिन्या यांनी ‘हिजाब प्रकरणी मुसलमान मुलींवर कशा प्रकारे अन्याय केला जात आहे’, याविषयीची वृत्ते प्रकाशित केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *