Menu Close

सांगली येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन !

सांगली येथील मारुति चौक येथे आंदोलन करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ

सांगली – ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीतील मारुति चौक येथे १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘‘व्हॅलेंटाईन डे’ची पाश्चात्त्य रित सोडा’, ‘हिंदु संस्कृतीचे आचरण करा’, ‘धर्माचरण करा, धर्माचरण करा, भारतीय संस्कृतीचे आचरण करा !’ ‘‘व्हॅलेंटाईन डे’ या पाश्चात्त्य विकृतीला हद्दपार करा’, ‘पाश्चात्त्य कुप्रथा बंद करा’, अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनप्रसंगी प्रशासनास देण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षरी करतांना भाजप नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर

आंदोलनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. ऐश्वर्या वांढरे यांनी केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन पवार, भाजपचे नगरसेवक श्री. सुब्राव मद्रासी यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, कु. प्रतिभा तावरे, श्रीमती मधुरा तोफखाने यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हरिदास कालिदास, भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर सनातन संस्थेच्या डॉ. मृणालिनी भोसले यांसह २० हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *