Menu Close

हिजाबविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यामुळे हिंदु तरुणाच्या घरावर धर्मांधाकडून आक्रमण

हिंदु तरुण आणि त्याच्या वृद्ध आईला मारहाण

  • हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आदींचा अवमान केल्यावर हिंदू कधी असे आक्रमण करतात का ? तरीही हिंदूंना तालिबानी ठरवले जाते; मात्र प्रत्यक्षात तालिबानी कृत्य करणार्‍यांच्या विरोधात देशातील निधर्मीवादी गांधीवादी भूमिका घेतात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 
  • कर्नाटकात भाजपचे राज्य असतांना हिंदू इतके असुरक्षित कसे राहू शकतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !  सरकारने या धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • अशा वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले कुठल्या बिळात लपून बसतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक चित्र)

दागणगेरे (कर्नाटक) – येथील नल्लूर गावात रहाणार्‍या नवीन या २५ वर्षीय तरुणाने हिजाबच्या संदर्भात सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केल्यामुळे धर्मांधांनी त्याच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली. यासह त्याला आणि त्याच्या ६० वर्षीय आईला मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे. मारहाणीत घायाळ झाल्याने नवीन आणि त्याच्या आईला शिवमोग्गा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. येथील स्थानिक आमदार आणि पोलीस यांनी गावात जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. (असे आवाहन करण्याऐवजी आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *