|
कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील रोहरी येथील शिरनवाली माता मंदिरात धर्मांधांनी तोडफोड करून मंदिरातील पैसे आणि सोने लुटून नेले. त्यांनी मंदिरातील देवतांच्या ५ मूर्तींची तोडफोडही केली. पाकमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी लढणार्या ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या संस्थेने याची माहिती ट्वीट करून दिली आहे, तसेच हिंदूंच्या मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या आक्रमणाचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
Pakistan: Another hindu temple, Shiranwali Mata Mandir attacked & vandalized, cash and gold stolen in rohri, sindh. pic.twitter.com/558mr63xTu
— MeghUpdates?™ (@MeghBulletin) February 11, 2022
१. सिंध मानवाधिकार आयोगाने या आक्रमणाचा निषेध केला आहे, तसेच अल्पसंख्यांकाच्या संदर्भात होणार्या हिंसेवर लक्ष ठेवण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे.
२. यापूर्वी २७ जानेवारीला सिंध प्रांताच्याच थारपारकर जिल्ह्यातील हिंगलाजमाता मंदिर पाकच्या प्रशासनाने पाडले होते. त्यापूर्वी वर्ष २०२० मध्ये नवरात्रीच्या वेळी धर्मांधांनी मंदिरातील देवीची मूर्ती फोडली होती.